शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

ग्रामपंचायतींनाच अधिकार द्यावेत

By admin | Updated: January 4, 2016 00:34 IST

घरबांधणी परवानगी : पंचायत समिती सभेत ठराव

रत्नागिरी : शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा व त्रासदायक असून, घरबांधणी परवानगीचे अधिकार पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायतींना द्यावेत, असा ठराव शनिवारी झालेल्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला. प्रभारी सभापती व उपसभापती योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेला सदस्य अनुष्का खेडेकर, फातिमा होडेकर, दाक्षायिणी शिवगण, स्मिता भिवंदे, स्नेहगंधा साळुंखे, महेश म्हाप, नदीम सोलकर व अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या नवीन निर्णयानुसार ग्रामपंचायतींच्या हद्दीतील बांधकामासाठी परवानगी देण्याचे अधिकार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत बांधकामांसाठी मंजुरी ही जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणार आहे. मात्र, ही परवानगी मिळवण्यासाठी सामान्यांना त्रासदायक ठरणार आहे, असे मत सर्वच सदस्यांनी मांडले. तसेच बांधकामांसाठी परवानगी घेताना अनेक दिवस किंवा महिने वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन घरबांधणीसाठी परवानगीचे अधिकार पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायतींना देण्यात यावेत, असा ठराव मंजूर करुन तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.या सभेत महावितरण, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. उपसभापती योगेश पाटील यांनी प्रभारी सभापती म्हणून उत्तमरित्या सभेचे कामकाज हाताळले. त्यामुळे काही दिवसांचे का होईना, सभापती म्हणून काम पाहिल्याबद्दल शिवसेना-भाजप युतीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. (शहर वार्ताहर)नाराजीचा सूर : ग्रामपंचायतींची कोंडीग्रामपंचायतींना घरपट्टी वसुलीला स्थगिती असल्याने त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींची कोंडी झाली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या अधिकारावर शासनाने आणखी एक घाला घातल्याने लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. घरबांधणीला परवानगी देण्याचे ग्रामपंचायतीचे अधिकारच काढून घेण्यात आले आहेत.