शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

‘त्यांच्या’ पत्नीला शासकीय नोकरी

By admin | Updated: December 22, 2014 00:21 IST

दीपक केसरकर : सावंतवाडीतील आढावा बैठकीत माहिती

सावंतवाडी : विद्युत तार पडून मृत झालेल्या युवकांच्या पत्नींना महावितरण नोकरीत सामावून घेणार आहे. त्यांना आयटीआयमध्ये प्रथम शिक्षण देण्यात येईल, त्यानंतर त्या नोकरीत रूजू होतील, असा धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर झाल्याची माहिती वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते सावंतवाडी येथे झालेल्या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत बोलत होते. तसेच जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होणार असून कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही स्पष्ट केले.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमारन, कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे, तहसीलदार सतीश कदम, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, उपविभागीय अभियंता अनामिका जाधव आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी केसरकर यांनी आंबा नुकसानी तसेच बागायतीबाबत खास बाब म्हणून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे याचे अहवाल तातडीने पाठवून देण्याच्या सूचना केल्या. इकोसेन्सिटिव्हबाबत जनसुनावण्या घेण्याचे निश्चित करण्याचे ठरले आहे. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी गावात जाऊन योग्य ती माहिती ग्रामस्थांना द्यावी, असेही अधिकाऱ्यांना सांगितले. हत्तींकडून नुकसानी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी हत्ती पकडण्याची मोहीम तातडीने राबवण्यात येणार आहे. वनविभागाला ३५ लाखाचा निधी कमी पडत असून तो निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले.ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवक तसेच सरपंच निधी खर्च करत नाही. मोठ्या प्रमाणात निधी मागे जातो, मात्र यापुढे असे होणार नाही. याची दक्षता उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यांना घेण्याचे आदेश देण्यात आले. कोणताही अधिकारी- कर्मचारी चुकीचे काम करीत असेल तर त्याबाबत कारवाई करा. तसेच सरपंच चुकीचे काम करण्यास सांगत असेल तर ग्रामसेवकाने कागदावर घ्यावे आणि नंतर ते जिल्हाप्रशासनाकडे पाठवावे, अशी सक्त ताकीद ही ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनीही काही समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)