शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

युतीचे सरकारच विकास करेल

By admin | Updated: November 2, 2015 00:27 IST

आशिष शेलार : नारायण राणे हेच खरे थापाडे; आघाडी सरकारच भ्रष्टाचारी व घोटाळ्याचे

कुडाळ : आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी, घोटाळ्याचे होते. आमचे सरकार हे भ्रष्टाचारमुक्त व लोकोपयोगी असून, शिवसेनेबरोबर युती करूनच हे सरकार पुढील चार वर्षांत महाराष्ट्राचा विकास करेल, असे प्रतिपादन कुडाळ येथील लोकसंवाद कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी करीत आमच्या मुख्यमंत्र्यांना थापाड्या म्हणणारे नारायण राणे हेच खरे थापाडे असल्याची टीका त्यांनी राणेंवर केली. कुडाळ येथील ओंकार डिलक्स सभागृहात युती सरकार स्थापनेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सुराज्याची वचनपूर्ती लोकसंवाद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, भाजप उपजिल्हाध्यक्ष राजू राऊळ, नियोजन सदस्य काका कुडाळकर, चारूदत्त देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष शिरसाट, दीपक शिरोडकर, विजय मराठे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शेलार म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेऊन काँग्रेसने फक्त राजकारण केले. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन सरकार स्थापनेपासून एका वर्षाच्या आत केले. काँग्रेसने याच स्मारकाच्या स्थापनेसाठी १२ वर्षे घालविली. यावेळी राजन तेली म्हणाले की, सरकारच्या वर्षपूर्तीच्या उत्सवासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले नसून, वर्षभरात सरकारने घेतलेले विकासात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व लोकसंवाद साधण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यास आम्ही कमी पडत आहोत. अनेक प्रश्न या सरकारने सोडविले व अजूनही सोडविणार आहे. वाळू, चिरे, मच्छिमारविषयी प्रश्न भाजपच्या मंत्र्यांनी सोडविले. एकीकडे सरकार चांगले निर्णय घेत असतानाच घाई मारून कोणी समुद्र्रात, तर अन्य ठिकाणी उपोषणास बसत आहेत. जरा धीर धरा, आमच्या सरकारच्या कामाचे चांगले निकाल लवकरच दिसतील. सर्व गोष्टींना विरोध केला तर कोकणचा विकास कसा होणार? विरोध करू नका, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)