शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग गुंडगिरीमुक्त करण्यासाठी सत्ता द्या

By admin | Updated: October 30, 2015 23:25 IST

विनोद तावडे : सत्तेच्या माध्यमातून वैभववाडी, दोडामार्ग विकसित करु

वैभववाडी : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुती जुटली आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्ग दादागिरी व गुंडगिरीमुक्त बनविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता महायुतीच्या हाती द्यावी. आम्ही केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून दोन्ही शहरे विकसित करुन दाखवू, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केले.नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी शिक्षणमंत्री तावडे व पालकमंत्री दीपक केसरकर वैभववाडीत आले होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयेंद्र्र रावराणे, अशोक रावराणे, सदा ओगले, राजन चिके, सुहास सावंत, संजय रावराणे आदी उपस्थित होते.तावडे पुढे म्हणाले, वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीची पहिली सत्ता चांगल्या लोकांच्या हातात मिळाली तरच शहरांच्या विकासाची पट्टी नीट चालेल. सुरुवातीलाच गडबड झाली तर मात्र ही चूक लवकर दुरूस्त होणार नाही याची दक्षता मतदारांनी घ्यावी. कारण पालकमंत्री युतीचे, राज्य आणि केंद्रात सत्ताही युतीचीच आहे. जनतेचे प्रश्न सत्तेशीच निगडीत असतात. त्यामुळे सत्तेतील माणसे निवडून दिली तर जनतेचे प्रश्न भराभर सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना, भाजप, आरपीआयच्या हातात सत्ता द्यावी, असे आवाहन तावडे यांनी केले.काँग्रेसने सत्तेत असताना किती घरातील तरुणांना नोकरी दिली. येथील जनतेने भाच्यावर विश्वास दाखवत नगरपंचायतीची सत्ता आमच्या हाती द्यावी, आम्ही प्रत्येक घरात रोजगार देऊ. जिल्'ाचे पालकमंत्री केसरकर आहेत. तरीही वैभववाडीचा अतिरिक्त पालकमंत्री म्हणून शहराच्या विकासाची जबाबदारी मी स्विकारत आहे. काँग्रेस १५ वर्षात जे करू शकली नाही ते आम्ही एक वर्षात करुन दाखवलंय. त्यामुळे युतीवर विश्वास दाखवून आजोळच्या विकासाची भाच्याला संधी द्यावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)राणेंचा विकास थांबला : केसरकरसिंधुदुर्गच्या विकासाला वर्षभरात गती आली आहे. सत्ता गेल्यामुळे नारायण राणेंचे जमिनींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळेच त्यांना विकास थांबल्याचा भास होतोय अशी खिल्ली उडवत राणेंच्या ताटाखालचे मांजर असणारे अधिकारी बदलल्यामुळे जिल्ह्यात सक्षम प्रशासन आले आहे. त्यामुळे विकास झपाट्याने सुरु आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.काँग्रेसमुळे वैभववाडी बदनाम : तावडेवैभववाडीचा मतदार विकला जातो, अशी काँग्रेसने सर्वत्र बदनामी केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी इथला मतदार विकला जात नाही, तर तो भावी पिढीच्या भवितव्यासाठी मतदान करतो हे दाखवून द्यावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे वैभववाडीवासीयांना केले आहे.