शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या वसतिगृहात महिला कर्मचारी द्या

By admin | Updated: February 3, 2015 23:54 IST

पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार : वेंगुर्ले कॅम्प येथील वसतिगृहास सभापतींची भेट

वेंगुर्ले : वेंगुर्ले-कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या वसतिगृहातील मुलींना शासनाच्या निर्देशानुसार ठरविलेला आहार दिला जात नाही. अस्वच्छ स्वयंपाकगृह आणि पाणी यामुळे मुलींच्या आरोग्यास धोका उद्भवू शकतो. तसेच मुलींच्या वसतिगृहासाठी गृहपाल आणि आचारीपदी मात्र पुरुषांची नियुक्ती केली असल्याने त्वरित महिला अधिकारी व कामगारांची नियुक्ती करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असल्याचे पंचायत समितीचे सभापती सुचिता वजराटकर यांनी सांगितले. यावेळी वजराटकर व गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहास सोमवारी अचानक भेट दिली. त्यामुळे तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थिनींना स्वयंपाक गृहातून पुरविले जाणारे जेवणाची दैनंदिनी आहारासह फलकावर लिहिली जाते; परंतु २५ जानेवारी २०१५ पर्यंतची नोंद फलकावर असल्याचे सभापतींना आढळून आले. प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक क्षमता असलेल्या या वसतिगृहात पन्नास मुलींनी प्रवेश घेतला आहे. वसतिगृहाचे अधीक्षक गृहपाल पी. जी. इंगळे यांच्याकडे मुलींच्या वसतिगृहांचा कार्यभार आहे. १६ आॅगस्ट २०१४ रोजी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात २२ सप्टेेंबर व १ नोव्हेंबर रोजी प्रसिध्दी करण्यात आली होती. या वसतिगृहाच्या कामकाजास आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, अद्यापपर्यंत समाज कल्याण विभागाने या वसतिगृहाचे डीडीओ अकाऊंट काढलेच नसल्याची माहिती या भेटीप्रसंगी उघड झाली. यासाठी १२ लाख रुपयांच्या अपेक्षित खर्चाचा अहवाल पुणे आयुक्त कार्यालयाकडे सादर करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. (वार्ताहर)महिला वसतिगृहातील स्वयंपाकगृहात शिळे अन्न, स्वयंपाकगृहातील टाकाऊ वस्तू तेथेच टाकलेल्या अवस्थेत सभापतींना आढळून आल्या. येथील मुली व मुलांच्या आरोग्य तपासणीबाबत अनियमितता, गृहपाल पदासाठी पूर्णवेळ अधिकारी नाही, प्रसाधनगृहाची फरशी व दरवाजे नादुरुस्त, मुलांच्या वसतिगृहात वीज कमी प्रमाणात अशा समस्या या भेटीदरम्यान आढळून आल्या.