शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यवसायातून परकीय चलन मिळेल

By admin | Updated: July 29, 2014 23:01 IST

पंकज भावे : ओरोस येथे कार्यशाळा

ओरोस : ओरोस शरद कृषीभवन येथे मत्स्य व्यवसायातील उपलब्ध साधनातील पायाभूत मुलभूत व भौतिक सुविधांच्या विकासाकडे केंद्र व राज्याचे लक्ष केंद्रीत करून व्यवसायाचे प्रमोशन केल्यास या मत्स्य व्यवसायातून भारताला मोठे परकीय चलन मिळू शकते, असे विचार भारत सरकारच्या मत्स्य उद्योग विकास महामंडळाचे संचालक पंकज भावे यांनी व्यक्त केले.शरद कृषी भवन ओरोस येथे मत्स्य व शेती, उद्योगाविषयी कार्यशाळेचे आयोजन शरद कृषी भवन ट्रस्टच्यावतीने उद्योजक अविनाश चमणकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.या एकदिवशीय कार्यशाळेत उत्तेकर फिशरिजचे संचालक रुपेश सकपाळ, मत्स्य उद्योग वरिष्ठ शास्त्रज्ञ ए. के. बलांगे, नॅशनल असोसिएशन आॅफ फिशरमनचे अध्यक्ष राजहंस टक्के, अविनाश चमणकर, जेनेसीस व्हेन्चर्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष विरेंद्र कोलेकर, व्हिक्टर डॉन्टस, अबीद नाईक आदी उपस्थित होते.यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी भारतात व राज्यात मत्स्य व्यवसायातील उपलब्धता यामध्ये येणारी बंदरे, तेथील सोयी सुविधा याबाबत माहिती दिली. शेतीप्रमाणेच मत्स्य व्यवसाय हा समुद्री शेतीचाच एक भाग आहे. मत्स्य व्यवसायिकतेचा दृष्टीकोन ठेवून मच्छिमारांनी मच्छिमारी करणे आवश्यक आहे. या चर्चेत आपल्या राज्यात एकही अद्ययावत जेटी नाही. ससून, माझगाव या डॉक या अत्याधुनिक नाहीत. ब्रिटीशकालीन असून त्यामध्ये सोयी सुविधा नाहीत हीच स्थिती बंदरांची आहे. कमी गुंतवणुकीत जादा नफा देणारा व्यवसाय मत्स्य व्यवसाय आहे. प्रजनन व पालन पोषण याबाबत स्लाईड शोमार्फत माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी मच्छिमारांनी चर्चेत सहभाग घेतला. जेनेसीस व्हेन्चर्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष विरेंद्र कोलेकर यांच्यासह उपस्थितांचा उद्योजक अविनाश चमणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शेखर सामंत, स्वागत अविनाश चमणकर यांंनी केले तर आभार सुरेश कौलगेकर यांनी मानले. (वार्ताहर) सुविधा पुरविणे गरजेचेशासनाने फिश लँडींग सेंटर, बोटी स्थिर ठेवण्याची सुविधा, बर्फ फॅक्टरी, खलाशांना लाईफ जॅकेट, अ‍ॅम्ब्युलन्स, जवळच पोलीस कस्टम, बंदर मत्स्य कार्यालये, रस्ता, आरोग्यविषयक सुविधा पुरविणे गरजेचे आहे.