शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जगाच्या राजकारणावर गांधीजींचा मोठा प्रभाव

By admin | Updated: February 6, 2017 00:31 IST

अनिल अवचट यांचे प्रतिपादन : वागदे येथील गोपुरी आश्रमात व्याख्यान

कणकवली : जगाच्या राजकारणात आज जी काही महत्त्वपूर्ण आंदोलने किंवा संघर्ष चालला आहे, त्यावर गांधीजींचा मोठा प्रभाव आहे. अगदी कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याच्या घटनेवरही गांधी विचारांचा प्रभाव आहे. भारताने जगाला काय दिले? असा प्रश्न उपस्थित झाला तर जगाला भारताने गांधीजी दिले, ही खूप महान गोष्ट आहे, हे आपण कदापीही विसरता कामा नये, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी येथे व्यक्त केले. वागदे येथील गोपुरी आश्रमात शनिवारी ‘गांधी समजून घेताना’ या कार्यक्रमात डॉ. अनिल अवचट बोलत होते. यावेळी सिंधुरत्न फाऊंडेशनचे डॉ. मिलिंद कुलकर्णी, संत वाङ्मयाचे अभ्यासक अ‍ॅड. देवदत्त परुळेकर, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते अ‍ॅड. संदीप निंबाळकर, गोपुरी आश्रम समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी यांनी डॉ. अवचट यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. अवचट म्हणाले, मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आदी जागतिक पातळीवरचे नेते हे गांधीजींना गुरू मानत. गांधीहत्येचे वृत्त ऐकून युरोपातील एका देशात असलेले मधु लिमये सैरभर झाले. सैरभैर अवस्थेत ते रस्त्यावरून फेऱ्या मारत होते. तेव्हा एक युरोपीयन माणूस त्यांच्याकडे आला आणि त्याने लिमये यांना विचारले ‘आर यू इंडियन?’ त्यावर लिमये यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यावर त्यांच्या शर्टाला धरत गदागदा हलवीत त्या युरोपियनाने मधु लिमयेंना विचारले ‘व्हाय यू किल्ड गांधी?’ ‘तुम्ही गांधींना का मारले?’, ‘गांधी काय तुमच्या एकट्याचे होते काय?’, ‘आमच्या गांधींना का मारले तुम्ही?’, असं तो युरोपीयन विचारत होता. इतके गांधीजी महान होते. सध्याच्या वाढत्या चंगळवादाशी संबंधित प्रश्नांवर डॉ. अवचट म्हणाले, कबिरानेच आपल्या दोह्यांमध्ये सांगून ठेवलेय की नावेमध्ये पाणी आणि घरामध्ये धन भरणे म्हणजे धोकादायक असते. नावेत अधिक पाणी भरले की नाव बुडते. तसे घरात अधिक धन झाले, तर घरही बुडण्याचा धोका असतो. यासाठी ‘गरजे इतकेच’ हा गांधी विचार समजून घ्यायला हवा. गत सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्वांची निवड करण्याचे जगाने ठरविले तेव्हा अल्बर्ट आईनस्टाईन व महात्मा गांधी ही दोनच नावे अंतिम निवडीपर्यंत पोहोचली होती. अखेरीस आईनस्टाईनला काही मते जादा मिळाली होती. पण त्याच आईनस्टाईनने ‘कदाचित काही पिढ्यानंतर गांधीजी नावाचे थोर व्यक्तिमत्व जन्माला आले होते, ही जगाला दंतकथा वाटेल’ असे गांधीजींविषयी आदराने उदगार काढले होते. गांधींचे हे मोठेपण आपण समजून घ्यायला हवे, असे डॉ. अवचट यांनी यावेळी सांगितले. ‘गांधी समजून घेताना’ या कार्यक्रमाचे आयोजन अ‍ॅड. देवदत्त परुळेकर, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले होते. आभार प्रा. मुंबरकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. नितीन शेटये, मंगल परुळेकर, संकल्प प्रतिष्ठानचे मुरादअली शेख, व्ही. के. सावंत, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रसाद घाणेकर, अर्पिता मुंबरकर, विजया चिंडक उपस्थित होते.(प्रतिनिधी)