शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चौदा जणांना अटक

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

आचरा येथील राडा : दहा महिलांचा समावेश, अटकसत्र जोरदार

आचरा : आचरा बंदरजेटी येथे पर्ससीन व्यावसायिकांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी आणखी १४ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये १० महिलांचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता अटक करण्यात आली. याप्रकरणी संशयितांचा पोलीस कसून शोध घेत असून जादा प्रमाणात पोलीस फोर्स आचऱ्यात दाखल असून अटक सत्राला जोरदार वेग आला आहे. मंगळवारी नव्याने अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहन बाबुराव सारंग (वय ५२, आचरा पिरावाडी), विठ्ठल मोहन सारंग (वय ३१, आचरा पिरावाडी), अरुण बाबुराव सारंग (वय ६२, आचरा पिरावाडी), सत्यवान अर्जुन पराडकर (वय ६३, आचरा पिरावाडी), मंदाकिनी रामचंद्र निकम (वय ५३, आचरा पिरावाडी), सुषमा कालिदास कोळंबकर (वय ५५, आचरा पिरावाडी), वसुंधरा वासुदेव कमळे (वय ४०, आचरा पिरावाडी), कविता अरुण सारंग (वय ५८, आचरा पिरावाडी), सिमाली सूर्यकांत चोपडेकर (वय ४७, आचरा पिरावाडी), समिता शैलेश सारंग (वय २७, आचरा पिरावाडी), छाया सत्यवान पराडकर (वय ५५, आचरा पिरावाडी), नमिता नारायण कुमठेकर (वय ५३), प्रतिक्षा प्रविण सारंग (वय ४५, आचरा पिरावाडी), माधुरी मोहन सारंग (वय ४०, आचरा पिरावाडी) यांना अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी सांगितले की, सोमवारी ओरोस येथे रुग्णालयात विजय ढोके यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेलो होतो. परंतु ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांनी आपला जबाब दिला नाही. आचरा पोलीस योग्य दिशेने कारवाई करत असून सीसीटीव्ही फुटेज, फोटो व पुराव्याच्या आधारेच कारवाई केली जात आहे. (वार्ताहर)एकतर्फी कारवाई नको : बबन शिंदे यांची मागणीआचरा पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत अटकसत्र राबवून १४ जणांना अटक केल्यावर मनसे, शिवसेना नेत्यांनी आचरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांची भेट घेत पारंपरिक मच्छिमारांवर हल्ला करणाऱ्यांवरही तुम्ही कारवाई करा. विजय ढोके याचा जबाब नोंदवून कारवाई कधी करणार अशी विचारणा केली. तर शिवसेना मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनी आचरा पोलिसांनी पारंपरिक मच्छिमारांवर एकतर्फी कारवाई करू नये अशी मागणी केली. यावेळी उदय दुखंडे, अरविंद घाडी, राजू नार्वेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.