शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून चौघेजण जखमी

By admin | Updated: May 28, 2014 01:33 IST

सांगवे बौद्धवाडीतील घटना : पावसाचा फटका

कणकवली : कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी मंगळवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील सांगवे बौद्धवाडी येथील अविनाश अर्जुन कांबळे या युवकासह चौघेजण वीज कोसळून जखमी झाले आहेत. या चौघांना कणकवली येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३0 वाजण्याच्या सुमारास कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी या पावसाने हजेरी लावली. फोंडाघाटसह सांगवे परिसरात तब्बल अर्धा तास पाऊस पडला. सांगवे बौद्धवाडी येथील अर्जुन नामदेव कांबळे (वय ५५) यांच्या अंगणात वीज पडून तिचा लोळ घरात घुसला. यावेळी घराच्या दरवाजात त्यांचा मुलगा अविनाश (वय २५) हा उभा होता. अचानक पडलेल्या विजेमुळे त्याला धक्का बसला. तो दरवाजातून अंगणात कोसळला. तर घरात असलेले अर्जुन कांबळे, त्यांची पत्नी अमिता कांबळे (वय ५०) व मुलगी सुप्रिया कांबळे यांनाही विजेचा धक्का बसला. अविनाश याला विजेचा जोरदार धक्का बसून तो अंगणात कोसळल्याने बेशुद्ध पडला होता. या घटनेबाबत माहिती समजताच पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत व सहकार्‍यांनी तत्काळ कांबळे कुटुंबीयांना कणकवली येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अविनाशसह कुटुंबीयांची प्रकृती आता सुधारत आहे. दरम्यान, या घटनेव्यतिरिक्त तालुक्यात पावसामुळे नुकसान झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत झालेली नव्हती. (वार्ताहर)