शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

राजकीय पदाधिकाऱ्यांचा घरोघरी प्रचारावर भर

By admin | Updated: April 15, 2016 00:41 IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : शेवटचा टप्पा, प्रचारामधील रंगत आणखीनच वाढणार--कुडाळ गावाकडून नगराकडे

रजनीकांत कदम -- कुडाळ  नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून आपल्या उमेदवाराचा व पक्षाचाच विजय व्हावा यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत असल्याचे चित्र कुडाळ शहरात दिसत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी कुडाळात दाखल झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात येथील प्रचाराची रंगत आणखीनच जोरदार वाढणार हे निश्चित.कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची १७ एप्रिल ही तारीख आता जवळ येत असून केवळ आजचा एकच दिवस प्रचार करण्यासाठी राहिला आहे. त्यामुळे शेवटच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे हे प्रमुख पाच राजकीय पक्ष उतरले आहेत तसेच या ठिकाणी अपक्षही मोठ्या प्रमाणात आहेत. १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात आहेत. पदाधिकारीही क्रियाशील केवळ नेते मंडळीच नव्हे तर कुडाळ शहरातील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा व पक्षाचा विजय करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात क्रियाशील झाले असून तेही ठाण मांडून कुडाळमध्ये बसून प्रचार करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जान्हवी सावंत व अन्य पदाधिकारी यांचा समावेश आहे. प्रचाराची रंगत वाढलीदरम्यान, मतदानाची तारीख जसजशी जवळ यायला लागली आहे तसतशी प्रचाराची रंगत वाढली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहचता येईल याकडे सर्वजण प्रामुख्याने लक्ष देत आहेत.प्रचाराच्या अनेक कल्पना निवडणुकीच्या प्रचारासाठी फलक लावणे, भित्तीपत्रक, जाहीरनामे यांचे वाटप करणे असे प्रकार सुरु असून शेवटच्या टप्प्यात आता चारचाकी गाड्या सजवून त्याच्यावर स्पीकर लावून तसेच शहरात ठिकठिकाणी मोटारसायकल रॅली काढून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. तर काहिंनी आपल्या बॅनरवर लावलेल्या घोषवाक्यांमुळेही ते उमेदवार खास करून लक्षात राहत आहेत. मात्र सर्व ठिकाणी प्रचार शांततेत नेहमी शांत असणारे कुडाळचे वातावरण या वाढत्या गरमीबरोबरच या निवडणुकीत तप्त होते की काय? असे सर्वांना वाटत होते. मात्र, या आतापर्यंतच्या काळात कोणताही प्रकारचा गोंधळ, भांडणे झाली नाहीत व एकंदरीत सर्वच प्रचार हा शांततेत पार पडला हे विशेष होय. प्रचार १५ एप्रिलला संपत असला तरी कंदील प्रचार सुरु राहणार असून आता प्रत्येकाचे लक्ष १७ एप्रिलवर आहे.आघाडी आहे युती नाही या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून ही निवडणूक लढवित आहे. याविरुद्ध सत्तेत युती करून सरकार चालविणारे शिवसेना व भाजप हे मात्र या ठिकाणी युती न करता स्वतंत्र लढत आहेत तर मनसेनेही आपले सहा उमेदवार उभे करीत या निवडणुकीत जोरदार उडी मारली आहे.सुरुवातीला संथगतीने निवडणुकीला उभे राहिल्यानंतर उमेदवाराला विजयासाठी सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रचार. याठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात अत्यंत संथगतीने प्रचार सर्वजण करीत होते. त्यामुळे याठिकाणी निवडणुकीचे तेवढे वातावरण वाटत नव्हते.प्रचाराला दिवस कमी सदरच्या या निवडणुकीचा कार्यक्रम पाहिला असता अत्यंत कमी वेळ प्रचाराला मिळालेला दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तारीख ही ४ एप्रिल होती व १५ एप्रिल रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे म्हणजे म्हटले तर ११ ते १२ दिवस एवढाच वेळ प्रचाराला मिळाला.नेते, पदाधिकारी प्रचारातसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे व मध्यवर्ती असणारे कुडाळ हे प्रमुख शहर व आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका यामुळे कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व राजकीय पटलावर प्राप्त झाले असून याठिकाणी आपल्या पक्षाचा विजय व्हावा असे प्रत्येक पक्षाला वाटत असून विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्वच प्रमुख नेते, पदाधिकारी ठाण मांडून बसले आहेत व प्रचारात भाग घेत आहेत.एकच सर्वांचे लक्ष संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळची ही एकच निवडणूक असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निवडणुकीत विजय कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. मोठे नेतेही प्रचारातविशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, भाजपकडून कल्याण डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, माधव भंडारी, शिवसेनेकडून पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, उदय सामंत असे राज्यातील मोठे नेतेही प्रचारात उतरले असून तेही कॉर्नर सभा तसेच घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देता आहेत. विकासाचा जाहीरनामा या प्रचारादरम्यान सर्वच पक्षाच्या वतीने कुडाळ वासियांसमोर कुडाळ शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा जाहीरनामा ठेवला असून कुडाळ शहर विकासाचे आयडॉल म्हणून आणणार असे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे कुडाळवासीय कोणाच्या बाजूने कौल देतात हेही पाहावे लागणार आहे.