शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

चक्का जाम!

By admin | Updated: January 31, 2017 23:53 IST

सकल मराठा समाज रस्त्यावर : महामार्गावर माती टाकली, टायर पेटविल्या

सिंंधुदुर्गनगरी : पोलिस प्रशासनाने आंदोलनकर्त्या मराठा बांधवांना प्रतिबंधात्मक स्वरूपाच्या कारवाईच्या नोटिसा बजावूनदेखील मंंगळवारी महामार्गावर ठिकठिकाणी मराठी बांधवांनी चक्का जाम आंदोलन केले. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ व कणकवली येथे जमलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इतर ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी गनिमीकाव्यामार्फत वेताळबांबर्डे, कसाल, कणकवली, तरंदळे फाटा या ठिकाणी महामार्गावर टायर पेटविणे, मातीचा ढीग तसेच झाड तोडून टाकल्याने, महामार्ग कित्येक वेळ रोखल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह १६४ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चे काढले होते. मात्र, याची राज्य सरकारने फारशी दखल न घेतल्यामुळे मंगळवारी राज्यभर एकाचवेळी महामार्ग तसेच राज्यमार्ग चक्का जाम करण्याचा एल्गार मराठा समाज समन्वय समितीने केला होता. त्यानुसार मंगळवारी सर्वत्र महामार्ग चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले.मराठा समाजाने चक्का जाम आंदोलनातील ठिकाणे जाहीर केल्याप्रमाणे सकाळपासूनच आंदोलनकर्ते जमा होत होते. प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात केला होता. जलदकृती दलाचे पथकही घटनास्थळी उपस्थित होते. महामार्ग विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यांना दोन दिवसांपूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ व कणकवली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते गोळा होऊन महामार्ग चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लागलीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांची कार्यपद्धती ओळखून अखेर आंदोलनकर्त्यांनी गनिमी काव्याचा आधार घेत महामार्ग चक्का जाम करण्याचा निर्धारच केला. जाहीर केलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी चक्का जाम न करता महामार्गावर दुसऱ्याच ठिकाणी चक्का जाम करण्यास आंदोलनकर्त्यांना यश आले. कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथे मार्गावर टायर पेटवून आंदोलनकर्त्यांनी खळबळ उडवून दिली. टायर विझवताना धावपळ उडाली. ओरोस-खर्येवाडी येथे महामार्गालगत असणारे भले मोठे झाड तोडून महामार्गावर टाकल्याने महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत महामार्ग मोकळा केला. (प्रतिनिधी)आंदोलनकर्त्यांचा गनिमी कावाआंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे लक्षात येताच उर्वरित आंदोलनकर्त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून महामार्गावर कसाल पुलाच्या तोंडावरच वाहनाच्या साहाय्याने माती ओतल्याने महामार्ग सुमारे अर्धा तास ठप्प होता. पोलिस फौजफाट्यासह दाखल होत कसाल पोलिसपाटील अनंत कदम यांच्या साहाय्याने रस्त्यावरील मातीचा भला मोठा ढिगारा बाजूला करण्यात आला. ही घटना सकाळी ११.४० च्या सुमारास घडली होती. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपअधीक्षक संध्या गावडे यांच्यासह पोलिस ताफा उपस्थित होता.