शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ध्वज स्तंभानजिक शोषखड्डा

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कुडाळ पंचायत समितीकडील प्रकार

कुडाळ : पंचायत समितीच्या परिसरातील ध्वज व संविधान स्तंभाच्या शेजारीच शौचालय शोषखड्डा टाकी बांधण्यात येत असून तेथील ध्वज व संविधान स्तंभाच्या दृष्टीने हे अत्यंत अपमानास्पद कृत्य आहे. मात्र, या गोष्टीकडे पंचायत समिती सदस्यांनी दुर्लक्ष केल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ पंचायत समितीच्या परिसरात गटविकास अधिकारी यांच्यासाठी नवीन शौचालय बांधण्यात येत आहे. या शौचालयाचा शोषखड्डा टाकी ज्या ठिकाणी बांधण्यात येत आहे त्याच्या बाजुलाच ध्वज स्तंभ तसेच संविधान स्तंभ पंचायत समिती सुरू झाल्यापासुन आहे. यामुळे शोषखड्डा या स्तंभाच्या बाजूला बांधून एका प्रकारे ध्वजस्तंभ व संविधान स्तंभाचा अपमान असल्याचे मत पंचायत समितीत येणाऱ्या जनतेतून बोलले जात आहे. या सर्व गोष्टीकडे येथील पंचायत समिती सदस्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील जनतेमध्ये याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.पंचायत समितीच्या परिसरातील शोषखड्डा टाकीची जागा बदलण्यात येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)शोषखड्डा बांधणे कितपत योग्य ?संविधान स्तंभावर भारताचे संविधान लिहिले आहे तर दुसऱ्या बाजूला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिकांची नावे लिहिलेली आहेत. त्यामुळे या स्तंभाच्या शेजारी शौचालयाचा शोषखड्डा बांधणे किती योग्य आहे. हाही प्रश्न जनतेला पडत आहे. शौचालयांच्या परिसरात घाणीचे साम्राज्यएकीकडे कुडाळ पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शौचालये आहेत. मात्र, त्या शौचालयांची स्वच्छता ठेवण्यात येत नाही. त्यामुळे त्या शौचालयांच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. असे असताना नव्याने हा घाट का घातला जातो, असा प्रश्न आहे.