शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत रोज पाच टन कचरा

By admin | Updated: August 19, 2015 22:56 IST

व्यवस्थापन आवश्यक : गार्बेज डेपोची मर्यादा संपणार लवकरच

कणकवली : वेगाने विकसित होणाऱ्या कणकवली शहरात कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. सुमारे १७ हजार लोकसंख्येच्या या शहरात रोज पाच टन कचरा गोळा होत आहे. हा कचरा शहराबाहेरील कचरा डेपोत सध्या फक्त टाकला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया न झाल्यास लवकरच कचरा डेपोची मर्यादा संपणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच पावले उचलावी लागणार आहेत. कणकवली शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील कचरा गोळा केला जातो. १२ घंटागाड्या घरोघरचा कचरा गोळा करतात. कचरा गोळा करण्याच्या कामी नगरपंचायतीचे नियमित १० कर्मचारी आणि कंत्राटी ३० कर्मचारी असे एकूण ४० कर्मचारी राबतात. त्याशिवाय कायझन गाड्या फिरवल्या जातात.शहरात प्रभागनिहाय कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ३१ कचरा पेट्यांमध्ये शहरातील कचरा गोळा होतो. ट्रॅक्टरमधून हा कचरा शहराबाहेर नागवे गावच्या सीमेलगत असलेल्या कचरा डेपोत टाकला जातो. शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा कचरा डेपो आहे. कचरा डेपो पाच एकर जागेत आहे. सध्या कोणतीही प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढिग येथे जमा होत आहेत. प्रक्रिया न करता येथे असाच कचरा टाकत राहिल्यास सुमारे पाच वर्षांतच कचरा डेपोची मर्यादा संपुष्टात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा ठाकणार आहे. विकसीत होणाऱ्या शहरांसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन ही डोकेदुखी होत आहे. रोज टनावरी गोळा होणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय? हा प्रश्न शहरांना भेडसावत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा रोजच्या रोज उचलून अन्यत्र टाकणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यवधी रूपये गुंतवणुकीची गरज असते. तसेच तो चालवण्यासाठीही शहर प्रशासन सक्षम असावी लागते. सध्या कणकवली नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे परवडणारे नाही. (प्रतिनिधी)वस्ती वाढल्यास कचरा वाढणारशहरात आता नोंदणीनुसार सुमारे १७ हजार लोकसंख्या आहे. मात्र दिवसेंदिवस शहरवासीयांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे कचरा समस्येवर तातडीने पावले उचलावी लागतील. प्रक्रिया केल्यास २५ वर्षांची मर्यादाकणकवली शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केल्यास कचरा डेपो २५ वर्षे वापरला जाऊ शकतो. अन्यथा लवकरच हा डेपो वापरण्याची मर्यादा संपुष्टात येईल.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीचा विचार नगरपंचायतीने केला होता. मात्र, हा प्रकल्प उभारणीसाठी कोट्यवधींचा निधी लागेलच. त्याचबरोबर प्रकल्प चालवण्यासाठी छोट्या स्तरावरील नगरपंचायत सक्षम नाही. कचरा व्यवस्थापनासंदर्भात आयआयटी पवईमध्ये संशोधन झालेले मॉडेल पाहून त्याचा कणकवलीसाठी विचार केला जाणार आहे.-अवधूत तावडे, मुख्याधिकारी, कणकवली नगरपंचायत.