शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १० ची लढत लक्षवेधी

By admin | Updated: October 30, 2015 22:45 IST

भाजप शहराध्यक्षांसमोर तिघांचे तगडे आव्हान

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. १० मध्ये चौरंगी लढत होत असून, येथून भाजपचे शहराध्यक्ष चेतन चव्हाण निवडणूक लढवित असल्याने भाजपसाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला आहे. तर काँग्रेसचे प्रवीण झालबा यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. मात्र, असे असले तरी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार पांडुरंग तळणकर व मनसेचे जीवन सावंत यांनी निवडणुकीच्या रिंंगणात एन्ट्री केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे तळणकर आणि सावंत यांना मिळणाऱ्या मतांच्या बेरीज-वजाबाकीवरच चव्हाण व झालबा यांचे भवितव्य अवलंबून आहे.ओंकार कॉलनी आणि हनुमान कॉलनीचा समावेश प्रभाग क्र. १० मध्ये आहे. याठिकाणी पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना एकसंघ असलेल्या प्रभागातून भाजपाच्या उमेदवार म्हणून चेतन चव्हाण यांच्या मातोश्री मनीषा चव्हाण ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रभाग रचना बदलल्याने ओंकार कॉलनी व हनुमान कॉलनी असा नवीन प्रभाग निर्माण झाला. त्यामुळे या प्रभागातून भाजपाचे शहराध्यक्ष चेतन चव्हाण निवडणूक लढवित आहेत. एक तरूण व तडफदार कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे शहराध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. युवा वर्गात नेहमी सहभागी होणारा चेहरा अशी त्यांची ओळख असल्याने चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे या जनसंपर्काचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर काँग्रेसचे प्रवीण झालबा हे राजकारणात नवखे आहेत. परंतु तरीसुध्दा काँग्रेसचे सर्व ताकदीनीशी पाठबळ त्यांना लाभल्याने आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत त्यांचा व्यवसाय असल्याने त्याचा फायदा त्यांना येथे होऊ शकतो. याचठिकाणी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार पांडुरंग तळणकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. ते पेशाने शिक्षक असल्याने त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. प्रभाग क्र. १० मध्ये शिक्षक, डॉक्टर असा बुध्दजीवी मतदार वर्ग आहे. त्यामुळे त्यांना कॅपचर करण्यात तळणकर यांना यश येऊ शकेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. तर मनसेचे जीवन सावंत हे सुध्दा नवखे असले, तरी शिवसेनेत असताना याच प्रभागात त्यांनी अंतर्गत रस्त्यासाठी निधी आणून मतदारांचे लक्ष स्वत:वर केंद्रीत करून घेतले आहे. त्यामुळे येथे चौरंगी लढत होणार असल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)