शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरूद्ध लढाई सुरूच राहणार

By admin | Updated: July 30, 2014 22:58 IST

दीपक केसरकर : कणकवलीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक

कणकवली : विकासाबाबत स्पर्धा करायची असेल तर मी कधीही तयार आहे. मात्र, कोकणातील जनतेचा अपमान कधीही सहन करणार नाही. आगामी विधानसभा निवडणूक ही दहशतवादाविरूद्धची निकराची लढाई आहे. ही लढाई अशीच सुरू राहणार असे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सावंतवाडीत येत आहेत. यावेळी घेण्यात येणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात कणकवली तालुका शिवसेनेच्या बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या बैठकीनंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नगरसेवक सुशांत नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार केसरकर म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पक्षसंघटना मजबूत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून युतीच्यावतीने निवडणूक लढविणारे आमदार प्रमोद जठार यांच्या पाठीशी शिवसैनिकांची पूर्ण ताकद उभी केली जाईल. यापूर्वीही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेने आघाडी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय संपादन केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणावर अतोनात प्रेम होते. त्यामुळे कोकणातील दोन मुख्यमंत्री त्यांनी बनविले. मात्र बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना आता जनताच धडा शिकवेल व बाळासाहेब ठाकरेंवरील आपले प्रेम सिद्ध करेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनाही नारायण राणे यांनी त्रास दिला आहे. त्यामुळे हे सर्वजण आमच्याबरोबर असतील. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबरीची वागणूक दिली जाईल असे जिल्हाप्रमुखांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना अधिक बळकटीसाठी प्रयत्न केले जातील.माझी जनतेशी बांधिलकी असून मी कोणाच्या अंगावर जात नाही. मात्र कोण अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांनी प्रथम माझी बरोबरी साधावी आणि त्यानंतरच टीका करावी, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना केसरकर यांनी सांगितले. (वार्ताहर)