शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

राजेशाही थाटातील उत्सव

By admin | Updated: September 4, 2014 00:08 IST

ओटवणेतील कुळाचा गणपती : गावरहाटीतील धार्मिकतेचा वारसा

ओटवणे : सावंतवाडी संस्थानचे मूळ असलेल्या ओटवणे गावाला संस्थानाच्या विविध राजेशाही रितीरिवाजांची परंपरा लाभली आहे. येथील कुळघराकडे विराजमान होणाऱ्या आणि ‘कुळाचा गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीला राजेशाही संस्थानबरोबर गावरहाटीतील धार्मिकतेचा वारसा लाभला आहे. या गणपतीची मूर्ती घडविण्यापासून ते विसर्जनापर्यंतचे सर्व धार्मिक रितीरिवाज आजही परंपरेप्रमाणे जपले जातात. गावात प्रमुख मानकऱ्यांच्या घरी विराजमान होणाऱ्या या गणपतीला ‘कुळाचा गणपती’ तसेच ‘गावाचा गणपती’ म्हणूनही संबोधले जाते. मातीतून मूर्ती घडविल्यानंतर हरितालिकेच्या, म्हणजे चतुर्थीच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत मूर्तीचे रंगकाम केले जाते. सूर्यादर्यापूर्वी हे रंगकाम आटोपते घ्यावे लागते. त्यानंतर प्रमुख गावकरी मानकऱ्यांच्या उपस्थितीत सूर्योदयानंंतर तळी ठेवून पूजा केल्यानंतर या मूर्तीची ‘नजर उघडण्याचे’ काम केले जाते. अशी या गणपतीची जागृत धार्मिकता आहे. या कुळाच्या गणपतीचे सावंतवाडी राजघराण्याचे नातेही जोडले गेले होते. यावेळी संस्थानकाळात या गणपतीसाठी ‘दीड रुपया’ एवढी आर्थिक बिदाई कूळ मानकऱ्याकडे दिली जात असे, असा उल्लेख आढळतो. रक्तवर्ण स्वरुपाच्या या मूर्तीचे पावित्र्य गांभीर्याने जपावे लागते. पूजाअर्चा आदी धार्मिक परंपरेबरोबरच स्वच्छता सुशोभित तेवढीच कठोररित्या जपावी लागते. या गणपतीला गाव रहाटीतील परंपरेप्रमाणे विशेष धार्मिकतेचा मान असल्याने ढोलवाद्यांची नौबत केली जाते. मूर्ती विसर्जनासाठी ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणुकीने नेली जाते. ती वाहनाने नेण्याचा प्रयत्न केल्यास विसर्जनास अडचणी निर्माण होतात, असे जाणकार सांगतात. या गणपतीचे विसर्जन सावंतवाडी संस्थानचे मूळ राजे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या समाधी स्थळावरील तेरेखोल नदीच्या त्रिवेणी संगमावरच परंपरेनुसार केले जाते. हा गावाचा-कुळाचा नवसाला पावणारा गणपती असल्याने गावातील भाविक या गणपतीचे आवर्जून दर्शन घेतात. (प्रतिनिधी)