शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

माणसी १५ किलो अन्नधान्याचा पुरवठा हवा

By admin | Updated: July 3, 2014 23:58 IST

दक्षता समिती सभेत ठराव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना

देवगड : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य पुरवठ्यामध्ये सुधारणा करून माणसी १० किलो तांदुळ व ५ किलो गहू असे १५ किलो धान्य देण्याची सुधारणा कायद्यात करा, अशी मागणी करणारा ठराव दक्षता समिती अध्यक्ष आमदार प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीच्या बैठकीत बुधवारी दुपारी तहसीलदार कार्यालयामध्ये करण्यात आला. यावेळी अध्यक्ष आमदार प्रमोद जठार, सचिव तहसीलदार जीवन कांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले व अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत व उपलब्ध माहितीनुसार २०११ साली ३५ किलो प्रति कार्ड पुरवठ्याच्या निकषाच्या वेळी तालुक्याला २२६ मेट्रीक टन धान्य पुरवठा झाला होता. मात्र अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यावर तालुक्याला १९६ मेट्रीक टन धान्य पुरवठा झाला. म्हणजे प्रत्यक्षात ३० टन धान्यपुरवठा कमीच झाला असल्याची बाब यावेळी पुढे आली. म्हणजे ३० हजार किलो धान्य प्रत्यक्षात देवगडच्या जनतेला कमी मिळाले आहे. त्यामुळे आता या कायद्यात सुधारणा करून माणसी १० किलो तांदुळ व ५ किलो गहू असा १५ किलो धान्य पुरवठा व्हावा अशी सूचना करणारा ठराव सभेने मंजूर केला.यानंतर आंबा बागायतदारांच्या मागणीनुसार सफेद केरोसिनचा पुरवठा व्हावा व त्यासाठी ठेकेदाराची नेमणूक व अन्य बाबींसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे तहसीलदार जीवन कांबळे यांनी मान्य केले. तसेच आगामी गणेशोत्सवाची वाढीव मागणी लक्षात घेऊन अन्नधान्य पुरवठ्यात वाढ करण्याची सूचनाही आमदार प्रमोद जठार यांनी केली. (प्रतिनिधी)