शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कांस्यपदक विजेत्या अपूर्व पवारचा सत्कार

By admin | Updated: January 29, 2015 00:13 IST

१४ वर्षांखालील मुलांमध्ये डबल या प्रकारात सहभागी झालेले साहील पवार आणि महेश परिहार यांनी अपूर्वला खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले आणि जिल्ह्याच्या यशात भर घातली.

रत्नागिरी : राज्यस्तरीय फूटबॉल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक विजेता अपूर्व पवार याचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा क्रीडा परिषद व प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी भारती संसारे, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर व जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनीही अपूर्वच्या यशाचे कौतुक केले.जिल्हा क्रीडा संकुल, सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ‘रत्नागिरी तालुका’ आणि ‘रत्नागिरी जिल्हा व शहर फुटबॉल टेनिस असोसिएशनच्या’वतीने १४ वर्षांखालील एकेरी प्रकारामध्ये अपूर्व पवार याने जिल्ह्याच्या संघाचे नेतृत्व करुन राज्यात तिसरा येण्याचा मान मिळविला आहे. यावेळी त्याच्यासोबत १४ वर्षांखालील मुलांमध्ये डबल या प्रकारात सहभागी झालेले साहील पवार आणि महेश परिहार यांनी अपूर्वला खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले आणि जिल्ह्याच्या यशात भर घातली. अपूर्व हा मूळचा फणसवळे गावचा सुपुत्र असून, रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेमध्ये शिकत आहे.प्रशिक्ष कचेतन घाणेकर तसेच क्रीडा मार्गदर्शक श्रीपाद गुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक बी. डी. पोवार, उपमुख्याध्यापिका माधुरी भिडे, पर्यवेक्षक सी. एस. पाटील, क्रीडाशिक्षक पी. एस. कांबळे व विनोद मयेकर यांनी अपूर्वचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळमपाटील यांनी अपूर्वचा सत्कार केला. यावेळी शिक्षणाधिकारी भारती संसारे, क्रीडाधिकारी नितीन तारळकर, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर आदी उपस्थित होते.