शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांची आघाडी-युतीवर टांगती तलवार

By admin | Updated: October 19, 2015 23:46 IST

दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक : उमेदवारांची धाकधुक तर कार्यकर्त्यांची दमछाक

दोडामार्ग : नगरपंचायत निवडणुकीत ५५ पैकी ६ उमेदवारांनी माघार घेतल्याने आणि एक अर्ज दुबार असल्याच्या कारणाने ४८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. यात कॉँग्रेस आघाडी, युतीचे ३४, मनसेचे ४, आरपीआयचा १ आणि अपक्षांच्या ९ उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीत आरपीआयबरोबर युतीने तडजोड न केल्याने आरपीआय प्रथमच या युतीतून बाहेर पडली आहे. दरम्यान, आघाडी आणि युतीवर अपक्षांची टांगती तलवार कायम असून माघारीनंतर उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. तर प्रमुख कार्यकर्त्यांची अकरा दिवसांच्या प्रचाराचे नियोजन आखण्याची दमछाक सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत नगरपंचायतीवर पहिल्यांदा आपलाच झेंडा फडकावयाचा या उद्देशाने प्रमुख चारही पक्ष सर्व ताकद लावून कार्यरत आहेत. दोडामार्गात १७ जागांसाठी ५५ उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी ६ जणांनी आपले अर्ज सोमवारी मागे घेतले. निवडणुकीच्या रिंंगणात ४८ उमेदवार राहिले असून, यामध्ये काँग्रेस १०, राष्ट्रवादी ७, भाजपा ९, शिवसेना ८, मनसे ४,आरपीआय १ तर अपक्षांच्या ९ अर्जांचा समावेश आहे. १७ पैकी ४ प्रभागात चौरंगी, ७ प्रभागात दुरंगी, तर ६ प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार अपर्णा अजित देसाई यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर प्रभाग क्रमांक ७ मधून फुलराणी ज्ञानेश्वर गावकर, प्रभाग क्रमांक १७ मधून देविदास कृष्णा गवस, लक्ष्मण फटी सावंत, श्रीराम जगन्नाथ गवस व संदेश दत्ताराम गवस अशा चौघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे लक्षवेधी असलेल्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. (प्रतिनिधी)नीलेश गवस यांची बंडखोरी कायमप्रभाग क्रमांक १७ मधून नीलेश शिवाजी गवस हे अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे आहेत. दोडामार्ग पंचायत समितीचे भाजपाचे विद्यमान सभापती महेश गवस यांचे बंधू. याठिकाणी प्रभाग १७ ची जागा सेना लढवत आहे. मात्र, सभापतींच्याच बंधूंनी बंडखोरी केल्याने प्रभाग १७ लक्षवेधी ठरला आहे. ही बंडखोरी थोपविण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले. त्यामुळे नीलेश गवस यांची बंडखोरी लक्षवेधी ठरली आहे.