शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तळकटची श्रध्दा नांगरे बेस्ट अ‍ॅथलेटिक्स

By admin | Updated: February 2, 2015 23:50 IST

यामध्ये सलग तीन वर्षे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली व महिला विभागात बेस्ट अ‍ॅथलेटिक्स पदाचा मान मिळविला.

कसई दोडामार्ग : दोडामार्ग भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअर पदावर काम करणारी तळकट येथील श्रध्दा चंद्रकांत नांगरे हिने याहीवर्षी क्रीडा स्पर्धेत १० सुवर्णपदकांची कमाई करून ‘बेस्ट अ‍ॅथलेटिक्स प्लेअर’चा मान पटकावला आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे. तळकट या ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन श्रध्दा नांगरे यांनी डिप्लोमा इंजिनियरपर्यंत शिक्षण पूर्ण करून तीन वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात सर्व्हेअर या पदावर नोकरीला लागली. सर्व्हेअर म्हणून काम करीत असतानाच तिने खेळांचाही छंद जोपासून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये सलग तीन वर्षे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली व महिला विभागात बेस्ट अ‍ॅथलेटिक्स पदाचा मान मिळविला. सन २०१२-१३ मध्ये भूमी अभिलेख क्रीडा स्पर्धेत नऊ सुवर्ण व कांस्यपदके, २०१३-१४ मध्ये बारा सुवर्ण व एक कांस्य पदकांची कमाई केली. तसेच ‘बेस्ट अ‍ॅथलेटिक्स प्लेअर महिला २०१४’ हा पुरस्कार तिने प्राप्त केला. यावर्षी या विभागामार्फत मुंबई-चेंबूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पाच सुवर्ण पदके तसेच गोरेगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके तेच बेस्ट प्लेअरचा मान मिळविला. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर व २०० मीटर धावणे, गोळा फेक, भालाफेक, लांबउडी या खेळांमधून तिने दहा सुवर्ण पदकांची कमाई केली. याकामगिरीने तिने दोडामार्ग तालुका व भूमी अभिलेख कार्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत भूमी अभिलेखचे उपअधीक्षक महेश गावकर, तसेच कार्यालयातील सहकर्मचारी व आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाल्यानेच आपण हे यश मिळवू शकले, अशी प्रतिक्रिया श्रध्दा नांगरे हिने व्यक्त केली. (वार्ताहर)