शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूरसारखे प्रकल्प विकासाला घातक

By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST

विनायक राऊत : दोडामार्ग महाविद्यालयात मार्गदर्शन

कसई दोडामार्ग : पश्चिम घाटाचे रक्षण करण्यासाठी ध्येयवेडी माणसे, शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे कोकणाला त्याचा फटका बसत आहे. जैतापूरसारखा घातक प्रकल्प कोकणाच्या विकासाला घातक आहे. असे असताना शासनकर्ते पश्चिम घाटाचे संवर्धन करण्यासाठी कमी पडत आहेत, असे मत खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग महाविद्यालयात आयोजित ‘पश्चिम घाट- जागतिक वारसा’ याविषयी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. दोडामार्ग महाविद्यालयात ‘पश्चिम घाट-जागतिक वारसा’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी केले होते. यावेळी खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, प्राध्यापक डॉ. व्ही. ए. पाटील, उद्योजक विवेकानंद नाईक, सुजन कोरगावकर, सूर्यकांत परमेकर, डॉ. राजेंद्र केरकर आदींसह विविध विषयाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, पश्चिम घाटाचे रक्षण होणे आवश्यक आहे. घाट वाचला तर आपण वाचणार आहोत. माधव गाडगीळ यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. ते म्हणाले, ‘कोकणातील साधनसंपत्तीवरच व्यवसायांची निर्मिती झाल्यास कोकणाचा विकास होणार आहे. गौण खनिजावरील बंदी योग्य नाही. पर्यावरणाचे संतुलन टिकविणे गरजेचे आहे. हा उपक्रम स्तुत्य असून ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर मानवाची उत्क्रांती अवलंबून आहे. समतोल ढासळल्यास त्याचे परिणाम मानवालाच भोगावे लागणार आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमीच तयार असते. जैतापूरसारख्या प्रकल्पांना विरोध होत नाही, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. प्रास्ताविकात अभिजीत हेगशेट्ये यांनी, माधव गाडगीळ कस्तुरीरंगन यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यासाठी जनतेने लढा देणे आवश्यक आहे. तरच नैसर्गिक साधनसंपत्ती वाचणार आहे, असे सांगितले. (वार्ताहर)