शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

प्रदूषण रोखण्यासाठी अतिरिक्त झाडे लावणार

By admin | Updated: February 13, 2015 22:54 IST

जनसुनावणीत सुचविले उपाय : पावसाचे पाणी अडवून पुन्हा वापरणार--लोकमत विशेष

नीलेश मोरजकर - बांदा मोपा विमानतळ प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जनसुनावणीत पर्यावरणविषयक चर्चा झाली. त्यात प्रदूषण रोखण्यासाठी हरितपट्टा तयार करणे, पावसाचे पाणी अडवून त्याचा पुनर्वापर करणे, तसेच सांडपाण्यावर उपाययोजना करणे आणि परिसरात अतिरिक्त झाडे लावणे आदी उपाय सुचविण्यात आले आहेत.मोपा येथील पठारावर १ फेबु्रवारी रोजी जनसुनावणी घेण्यात आली. त्यात ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’ या कंपनीने पर्यावरणविषयक अहवाल सादर केला. विमानतळ प्रकल्प परिसरात ३८५ प्रकारच्या उपयोगी वनस्पती व ८५ जातीच्या विविध पक्ष्यांच्या जाती या परिसरात आहेत. या परिसराची ७,२९८ लोकसंख्या असून १,६४0 कुटुंबे विमानतळ परिसरात आहेत. येथील हवा प्रदूषण, धूर नियंत्रण यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर उपाययोजना करण्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी ज्या झाडांची तोड करण्यात येणार आहे, त्याच्या बदल्यात विमानतळ परिसरात अतिरिक्त झाडे लावण्यात येणार आहेत. मोपा विमानतळ घटनाक्रममार्च २००० - मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. (तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकार).२००२ - भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ. प्रकल्पासाठी २१०० एकर जमिनीची आवश्यकता. सुरुवातीला ८० टक्के म्हणजेच १८६० एकर जमीन संपादित करण्यात आली. अन्यायकारक जमीन संपादनाविरोधात शेतकरी न्यायालयात.२००५ - आयकाव (इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन आॅर्गनायझेशन) चा पहिला अहवाल सादर.२००७ - आयकावचा दुसरा अहवाल सादर.२००७ - मोपा विमानतळ प्रकल्पाला विरोध करण्यासाठी दक्षिण गोव्यातील वजनदार नेते चर्चिल आलेमाव यांच्याकडून ‘सेव्ह गोवा पार्टी’ची स्थापना. त्यानंतर झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत दोन आमदारांची निवड.२००९ - विमानतळ प्रकल्पाचे सल्लागार असलेल्या ‘मेसर्स अमान अ‍ॅण्ड व्हायटनी’ कंपनीने तयार केला मास्टर प्लॅन.२०१० - केंद्र सरकारकडून मोपा हरित आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी.आॅक्टोबर २०१४ - गोवा राज्य मंत्रिमंडळाकडून मोपा ‘आरएफक्यू’ (रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन) मसुद्याला मंजुरी. शासनाच्या आरएफक्यूला १५ खासगी कंपन्यांकडून प्र्रतिसाद.नोव्हेंबर २०१४ - मोपासाठी आरएफक्यू निविदा जारी. ‘गोवन्स फॉर दाबोळी ओन्ली’ कडून मोपाला विरोध. या प्रकल्पाविरोधात जाहीर सभा.१ फेबु्रवारी २०१५ - मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी मोपा येथील पठारावर प्रकल्पबाधित गावांमधील जनतेसाठी गोवा शासनाकडून जाहीर जनसुनावणी. या जनसुनावणीत मोपा विमानतळ प्रकल्पाला ९0 टक्के समर्थन. विरोधकांना बोलण्यास मज्जाव. स्थानिकांना प्रकल्पात सामावून घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली.हरितपट्टा तयार करणारहवा व जमिनीवरील प्रदूषण रोखण्यासाठी हरितपट्टा तयार करण्यात येणार आहे. पावसाचे पाणी अडवून प्रक्रिया करुन ते वापरण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी आपत्कालीन योजना राबविण्यात येणार आहे.