शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

उत्खनन मार्ग अखेर मोकळा

By admin | Updated: December 23, 2014 23:44 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच तालुक्यातील व्यावसायिकांचा उत्खनन मार्ग मोकळा

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील अधिस्थगनाखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांतील उत्खननाच्या परवान्यांना अखेर काल सायंकाळी झालेल्या जिल्हा खाणकाम योजनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे आता पाच तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणाऱ्या २९२ गावांसह एकूण ९९६ गावांवर अधिस्थगन लागू करण्यात आले होते. इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणारी २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांना या बंदीचा २०१० सालापासून आर्थिकदृष्ट्या फटका बसला होता. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने अधिस्थगनाखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांवरील बंदी उठविण्याचा निकाल दिला. बंदी उठल्याने परवाने लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती चिरेखाण व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली काल (सोमवारी) सायंकाळी झालेल्या जिल्हा खाणकाम समितीच्या बैठकीत या पाच तालुक्यातील २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांमध्ये उत्खननासाठी परवानगी मिळाली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्यासह सदस्य सचिव जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभागाचे अधिकारी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या समितीने या पाच तालुक्यांतील गट क्रमांक आणि सर्व्हे नंबर यांना मंजुरी दिली.आता या व्यावसायिकांना ५०० ब्रास उत्खननासाठी तहसीलदारांची, तर २००० ब्रास उत्खननासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता या व्यावसायिकांकडून नव्याने प्रस्ताव दाखल होणार आहेत. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून बंदीत अडकलेल्या या पाच तालुक्यातील ६३४ गावांमधील व्यावसायिकांच्या व्यवसायातील अडसर दूर झाला असून, त्यांच्यावर अवंलबून असलेल्या कामगारांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यातूनही समाधान व्यक्त होत आहे. आता लवकरच या तालुक्यातील चिरेखाणीही धडधडू लागणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांनाही सोपे जाणार आहे. (प्रतिनिधी)व्यावसायिकांचा निश्वास खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असणाऱ्या २९२ गावांसह ९९६ गावांवर अधिस्थगन होता लागू.झोनमधील २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांना या बंदीचा २०१० सालापासून फटका.न्यायालयाने अधिस्थगनखाली असलेली २९२ गावे वगळून उर्वरित ६३४ गावांवरील बंदी उठविण्याचा दिला निकाल.