शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

सी वर्ल्ड प्रकल्पासाठी अभ्यासगट स्थापन

By admin | Updated: December 13, 2014 23:48 IST

बाबा मोंडकर यांची माहिती : भाजप प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील

मालवण : वायंगणी-तोंडवळी येथे होऊ घातलेल्या सी वर्ल्ड प्रकल्पाच्या उभारणीबाबत यापूर्वीच्या शासनाने घातलेला घोळ तसेच या प्रकल्पाचे नेमके स्वरूप समोर न आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. यातूनच या प्रकल्पाला तीव्र विरोध झाला. मात्र, पर्यटन विकासासाठी सी वर्ल्ड प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी भाजपा प्रयत्नशील असून हा प्रकल्प सर्व अडीअडचणी दूर करून मार्गी लावण्यासाठी भाजपातर्फे सी वर्ल्ड प्रकल्पासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.येथील भाजपा कार्यालयात तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी विलास हडकर, भाऊ सामंत, मनोज मोंडकर, अविनाश पराडकर, समीर बावकर, विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना मोंडकर म्हणाले, यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने सी वर्ल्ड आणण्यासाठी ग्रामस्थांवर हुकूमशाही पद्धतीचा अवलंब केला. हा विषय तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळला. यामुळेच ग्रामस्थांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला. या अभ्यासगटाचे अध्यक्षपद विलास हडकर यांच्याकडे सोपविण्यात आले असून यामध्ये भाऊ सामंत, अविनाश पराडकर, बाबा मोंडकर, समीर बावकर, मनोज मोंडकर, गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर यांचा समावेश आहे असेही त्यांनी सांगितले.अभ्यासगटाच्या माध्यमातून सी वर्ल्डच्या आराखड्याची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना दिली जाईल. तसेच ग्रामस्थ, गावकमिट्या यांच्या भेटी घेऊन प्रकल्प होण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांचे सकारात्मक मत परिवर्तन केले जाईल. प्रकल्प उभारणीच्या कामात पारदर्शकता आणून ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. (प्रतिनिधी)शिवसेना आता सकारात्मक होईल शिवसेना यापूर्वी प्रकल्पास विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या बाजूने होती. मात्र, आता भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेनाही सकारात्मक भूमिका घेईल असा विश्वास यावेळी विलास हडकर यांनी व्यक्त केला.