शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविले

By admin | Updated: December 11, 2014 23:43 IST

पालिकेची कारवाई : सावंतवाडी शहरातील घटना

सावंतवाडी : शहरातील रामेश्वर प्लाझासमोर असलेल्या पार्किंगच्या जागेत गाळेधारकांनी अतिक्रमण केल्याच्या वाढत्या तक्र्रारीनंतर नगरपालिकेने गुरूवारी हे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले. यावेळी काही गाळेधारकांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेत आमच्यावरील अन्याय दूर करा, अशी मागणी केली. मात्र, नगरपालिका अतिक्रमण हटविण्याच्या पवित्र्यावर ठाम राहिली.पालिकेचे एक पथक गुरूवारी दुपारच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात रामेश्वर प्लाझा परिसरात दाखल झाले. गाळेधारकांना दिलेल्या नोटिसीप्रमाणे हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, असे आदेश दिले. मात्र गाळेधारकांनी हे अतिक्रमण हटविले नव्हते. त्यामुळे पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. यावेळी अनेक गाळेधारकांची पालिका कर्मचाऱ्यांशी तू तू मै मै झाली. मात्र, पालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केल्याने कोणीही त्याला जास्त विरोध केला नाही.मात्र, याच पार्कींग भागात असलेल्या जनरेटर वरून मात्र, थोडासा वादंग झाला. जनरेटर काढण्याच्या तयारीत असताना राजू मसूरकर यांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. मात्र, पालिकेने यापूर्वी जनरेटरधारकास नोटीस न दिल्याने आजची कारवाई तात्पुरती स्थगित ठेवली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप दिवटे, सुनिल पवार, वाहतूक पोलीस किरण कांबळी, सहदेव मठकर आदींबरोबरच पालिका कर्मचारी आसावरी शिरोडकर, नागेश बिद्रे, बाबू पिंगुळकर, प्रदीप सावरवाडकर, सुनिल परब आदींनी या कारवाईत सहभाग नोंदवला होता. (प्रतिनिधी)कारवाई योग्यचपालिकेच्या आक्रमक भूमिकेनंतर गाळेधारकांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. या भेटीत आपल्यावरील अन्याय तत्काळ थांबवा, अशी मागणी या गाळेधारकांनी केली. तसेच महोत्सवाला सहकार्य करणार नसल्याचा पवित्रा घेतला. मात्र, या दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष साळगावकर यांनी आमची कारवाई योग्य असून नियमाप्रमाणे कारवाई आहे. आमच्यावर दबाव आणू नका, असे साळगावकर यांनी स्पष्ट केल्यानंतर गाळेधारक आल्या पावली निघून गेले.