शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जांभळाच्या मागणीला जोर

By admin | Updated: May 14, 2015 00:29 IST

रानमेव्याला सुगीचे दिवस : चांगल्या भावामुळे विक्रेत्यांमध्ये समाधान

बाळकृष्ण सातार्डेकर- रेडीउन्हाळ्याच्या दिवसात खाण्यात रेलचेल असते ती ग्रामीण भागातील रानमेव्याची. सध्या रानमेव्याला सुगीचे दिवस आले आहेत. सध्या पर्यटक आणि सुटीच्या दिवसात गावाकडे वळलेले चाकरमानी जांभूळ या रानमेव्याची चव चाखत आहेत. जांभळाच्या हंगामी पिकाची रेडी, शिरोडा, आरोंदा या पंचक्रोशीतून निर्यात वाढली आहे. सध्या जांभळाला मिळणारा भावही विक्रेत्यांसाठी समाधानकाक असल्याने यावर्षी जांभूळ उत्पादक, मजूर व विक्रेते खूश आहेत.दरवर्षी जांंभळाला ७० ते ८० रुपये किलो दर मिळत होता; यावर्षी मात्र हा दर २०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एप्रिल व मे महिना म्हणजे सुटीचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागाबरोबर शहरी व विशेष करून चाकरमानी जांभूळ, करवंदे, या रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. बाजारात जांभळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे वाढलेल्या नफ्यामुळे उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. आंब्यापाठोपाठ जांभळाला मागणी जांभळाच्या सर्व गुणांमुळेच बाजारपेठेतील जांभळाची मागणी वाढत आहे. दरवर्षी सुमारे ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणाऱ्या जांभळाने यावर्षी मात्र २०० चा आकडा पार केला आहे. विकत घेऊन जांभूळ खाणे परवडणारे नसले तरी जांभळाची मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे काळ्याभोर, टपोऱ्या तसेच रसरशीत जांभळांनी बाजारात आंब्यापाठोपाठ दर घेतला आहे. बहुपयोगी जांभूळजांभूळ हे तसे दुर्लक्षित फळ, परंतु जांभळाचा वापर मधुमेहावरच्या औषधांसाठी प्रामुख्याने केला जातो. तसेच या फळापासून उत्कृष्ट दर्जाचे मद्यही तयार केले जाते. जांभळाचा रस काढून त्याच्यापासून जांभूळ सरबत, स्क्वॅश, जेली तसेच औषधी सिरपही तयार केले जाते. त्यामुळे लघुउद्योजकांनाही जांभूळ उत्पादनाने रोजगार निर्मिती करून दिली आहे. जांभळाच्या बिया आयुर्वेदात अधिक उपयुक्त ठरत आल्या आहेत. जांभळाच्या रसाला तसेच बिया व भुकटीला औषधी गुणधर्म आहेत. जांभूळ सेवन केल्याने शरीरातील रक्ताच्या शुद्धिकरणास मदत होते. तसेच जांभूळ हे उत्तम पाचक असल्याने पचनशक्ती वाढविण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. निर्यात वाढलीस्थानिक भागातील विक्रीबरोबच जांभळाची निर्यातही वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जांभूळ आरामबस व अन्य वाहनांद्वारे परजिल्ह्यात, राज्यात व मंबईकडे पाठविली जात आहेत. एकूणच जांभळाची वाढलेली निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत मिळणारा चांगला भाव यामुळे उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.