शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी परिसरात हत्तींचा धुमाकूळ

By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST

कोटींचे नुकसान : चोख बंदोबस्त करण्याची मागणी

कसई दोडामार्ग : गेल्या १५-२० दिवसांपासून बाबरवाडी तिलारी परिसरात धुमाकूळ घालत बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना कंगाल केले असतानाही जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यास वनविभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने बाबरवाडीतील संतप्त शेतकरी व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्या नेतृत्वाखाली कोनाळ येथील वनअधिकाऱ्यांना घेराव घालून हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी केल्यानंतर बाबरवाडी व तिलारी कर्मचाऱ्यांना तैनात करून हत्तींना रोखले जाईल, असे आश्वासन वनपाल देसाई यांनी दिले. गेल्या १५-२० दिवसांपासून बाबरवाडीत १०-१५ शेतकऱ्यांच्या तसेच तिलारी धरण परिसरात राजेंद्र म्हापसेकर यांच्या बागायतीत घुसून जंगली हत्तींनी केळी-माड बागायती, सुपारी, फणस व इतर झाडांचे मिळून क ोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. जवळ जवळ सर्वच बागायती हत्तींच्या कळपाने पूर्णपणे भुईसपाट केल्याने शेतकरी भिकेकंगाल झाले आहेत. असे असताना वन विभागाकडून या हत्तींचा बंदोबस्त करण्यास पूर्णत: दुर्लक्ष केले जात असल्याने बाबरवाडीतील ३० ते ३५ शेतकरी, बागायतदार व राजेंद्र म्हापसेकर यांनी मंगळवारी सकाळी कोनाळ वन विभागाचे एम. डी. देसाई व इतर कर्मचाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. जंगली हत्तींना रोखून शेतकऱ्यांना जगू द्या. अन्यथा शेतकऱ्यांच्या रक्षणाची व पालनपोषणाची जबाबदारी तुम्ही घ्या, अशा शब्दात कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. गेल्या महिन्यापासून हत्तींकडून नुकसान होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलिकडे वनविभाग काही करू शकला नाही, हे सर्व आमच्या सहन करण्यापलिकडे गेले आहे, असे सांगून वनकर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. अखेर आजपासून बाबरवाडीत व तिलारीत वनकर्मचारी तैनात केले जातील, असे आश्वासनवन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. (वार्ताहर)