शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनावर अंकुश नसल्याने विकास ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 00:35 IST

कणकवली नगरपंचायत : विरोधी नगरसेवकांचा आरोप

कणकवली : कणकवली शहरातील अनेक विकासकामे रखडली असून नागरिकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. घरपट्टी वाढीचा निर्णय घेणारे सत्ताधारी जनतेच्या सुविधांमध्ये वाढ करणार का? असा प्रश्न उपस्थित करतानाच नगराध्यक्षा तसेच सत्ताधाऱ्यांचा नगरपंचायत प्रशासनावर अंकुश नसल्यानेच कारभारात ताळमेळ नसल्याची टिका विरोधी नगरसेवक सुशांत नाईक व राजश्री धुमाळे यांनी केली आहे. कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सोमवारी अवधूत तावडे यांनी स्वीकारला. नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत विरोधी नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर या नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका नंदिनी धुमाळे उपस्थित होत्या. सुशांत नाईक व राजश्री धुमाळे म्हणाले, नगरपंचायतीकडून शहरातील घरपट्टी वाढविण्यात येणार आहे. मात्र शहरातील नागरिकांना अपुऱ्या सुविधा मिळत आहेत. या सुविधांमध्ये घरपट्टी वाढीनंतर वाढ होणार का? हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे. नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी आपल्या घरासमोरील दगडी कुंपण हटवून पुन्हा त्याच ठिकाणी बांधले आहे. रस्त्यासाठी जागा सोडल्याचे त्यांनी नाटक केले आहे, असा आरोप करतानाच विरोधी नगरसेवक म्हणाले की, सत्ताधारी नगरसेवक प्रशासनाला विकासकामांसाठी सहकार्य करीत नसतील तर इतरांनी तरी का करावे? असा प्रश्न निर्माण होतो. या रस्त्यासाठी भूसंपादन करताना सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटार न खोदल्यास रस्ता खराब होणार आहे, याचीही दक्षता घेण्यात यावी. शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प अपूर्ण असून भुयारी गटार योजनेच्या सर्व्हेक्षणानंतर हा प्रश्न पुढे सरकलेला नाही. भुयारी गटार योजनेमुळे कणकवलीच्या विकासावरही परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी अशुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असून त्याबाबत पत्रक देऊनही नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शिवशक्तीनगर रस्त्यालाही विलंब होत असल्याचे विरोधी नगरसेवकांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)