शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांचे परवाने रद्द

By admin | Updated: January 23, 2015 23:43 IST

उपप्रादेशिक परिवहनविभागाची कारवाई

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या विशेष पथकामार्फत अवैध वाहतूक व क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या १० वाहनचालकांचे परवाने १५ दिवसांत रद्द केले आहेत. तसेच वाहन कर (टॅक्स) बुडविणाऱ्या २00 वाहनांवर कारवाई करीत त्यातून ३९ लाख रुपयांचा दंडही घेतला आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत सिंधुदुर्गात ११ ते २५ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जात आहे. नियम धाब्यावर बसवून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एक फिरते विशेष पथक कार्यरत असून, बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. सुरक्षा पंधरवड्यात या पथकाने शिरोडा येथील नऊ खासगी रिक्षाधारकांना अवैधप्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली असून, सर्व रिक्षा नजीकच्या पोलीस ठाण्यात लावल्या आहेत. त्यांच्याकडून ३० हजारांचा दंडही वसूल केला असून, या सर्व चालकांचे परवाने सात दिवसांसाठी निलंबित केले आहेत. वाहनचालकांना लाखोंचा दणकाजिल्ह्यातील काही वाहनधारक ‘वाहन कर’ भरत नाहीत, अशा वाहनचालकांच्या विरोधात या दरम्यान केलेल्या कारवाईत शेकडो वाहनचालकांनी टॅक्स भरला नसल्याचे उघड झाले असून, अशा वाहनधारकांकडून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विशेष भरारी पथकाने तब्बल ३९ लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.उपप्रादेशिक परिवहनविभागाची कारवाई३९ लाख रुपयांचा दंड जमा२०० वाहनचालकांवर कारवाईअवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या तब्बल २०० वाहनधारकांवर आरटीओ विभागाने या पंधरा दिवसांत कारवाई केली. त्यातून सहा लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे. ही कारवाई मोटारवाहन निरीक्षक यु. आर. पाटील, पी. आर. रजपूत, उदय पाटील, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.