शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

कुडाळात रंगला ‘द्रौपदी वस्त्रहरण’

By admin | Updated: June 30, 2014 00:09 IST

मान्सून महोत्सव : दशावतारात ३५ साड्या परिधान; रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : येथील लाजरी क्रिकेट क्लब आयोजित मान्सून महोत्सवातील संयुक्त दशावतार नाट्य कंपनीनिर्मित ‘द्रौपदी वस्त्रहरण’ नाटक पाहण्यासाठी जिल्ह्यातील तसेच गोव्यातीलही रसिकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी ३५ साड्या परिधान केल्याने साक्षात महाभारत चालू असल्याचा आभास होत होता. एक चांगले नाटक पाहण्याची संधी दिल्याने प्रेक्षकांनी आयोजकांचे आभार मानले. कुडाळ येथील लाजरी क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर यांच्या संकल्पनेतून मान्सून महोत्सव आयोजन करण्याची संकल्पना गेल्यावर्षी आली होती. त्यानुसार त्यांनी गेल्यावर्षीही संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग व पुरुष विरुध्द महिला भजनी डबलबारीच्या सामन्याचे आयोजन केले होते. गेल्यावर्षीही या महोत्सवालाही प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. यावर्षी या मान्सून महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी कुडाळचे माजी सरपंच अरविंद शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच स्रेहल पडते, उपसरपंच विनायक राणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, लाजरी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष राजू पाटणकर, बंड्या सावंत, नीलेश तेंडुलकर, सदानंद कुडाळकर, राजेश महाडेश्वर, दशावतार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळा सावंत आदी उपस्थित होते. यावेळी रणजीत देसाई म्हणाले, या क्लबने गेल्यावर्षीपासून या महोत्सवात सातत्य ठेवून रसिक प्रेक्षकांना चांगल्या कलाकृतीचे दर्शन घडविले आहे. हे त्यांचे सातत्य टिकून रहावे. अभय शिरसाट यांनी, जिल्ह्यातील सर्व दशावतार नाट्यकंपनीतील निवडक दशावतार कलाकारांना एकत्र करून त्यांचे संयुक्तिक दशावतार नाटक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देणे हे लाजरी क्रिकेट क्लबचे काम कौतुकास्पद आहे, असे सांगितले. विरत्व, शोक, शृंगार व प्रासंगितकतेचे दर्शनसंयुक्त दशावतार कंपनीतील दशावतार कलाकारांनी हे नाटक सादर करताना आपल्या अभिनयातून विरत्व, शोक, शृंगार, प्रासंगिकता आणि नवरसांचे दर्शन घडवून कथानकाच्या आशयापासून शेवटपर्यंत एक चांगल्या कलाकृतीचा आस्वाद प्रेक्षकांना दिला. साक्षात महाभारतातील प्रसंगच सुरू असल्याचा आभास यावेळी निर्माण झाला होता. उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषाया नाटकातील पात्राने पात्राला साजेशी अशी उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा केली होती. त्यामुळे प्रत्येक प्रसंग हा खरोखरचा वाटत होता. या मान्सून महोत्सवात सादर झालेली संयुक्त दशावतार नाट्य कंपनीच्या ‘द्रौपदी वस्त्रहरण’ नाटकावेळी जिल्ह्यातील तसेच गोव्यातील प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. हॉल खचाखच भरून हॉल बाहेरच्या आवारातही हजारो प्रेक्षक उपस्थित होते. शेवटी आयोजकांना बाहेरच्या प्रेक्षकांसाठी स्क्रिनवर नाटक दाखवावे लागले. हजारो प्रेक्षक असूनही अत्यंत चांगल्या पध्दतीने कार्यक्रम पार पडला. कोणत्याही प्रकारचा गदारोळ, भांडणे झाली नाहीत. आयोजकांचे चांगले नियोजन, बक्षिसांचा प्रेक्षकांकडून पाऊस पडला. आणि वाहने भरभरुन माणसे येतच होती. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन चांगले व्हावे यासाठी राजेश म्हाडेश्वर, राजू पाटकर, मयूर शिरसाट, विनायक राणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन राजा सामंत यांनी करून रसिकांची मने जिंकली. अशाप्रकारे संयुक्त दशावतार कलाकारांचे नाटक आयोजित करून दशावताराचे एक वेगळे दर्शन रसिक प्रेक्षकांना लाजरी क्रिकेट क्लबने घडविले. यामुळे दशावतार कलाकारांनाही नवसंजीवनी मिळाली आहे. (प्रतिनिधी)