शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नाटळ तांबेवाडीतबिबट्याचा संचार

By admin | Updated: July 20, 2014 22:15 IST

पंधरा दिवसशेतकरी भयभीत

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ तांबेवाडी येथील शेतकरी रघुनाथ राणे यांचा एक बैल बिबट्याने ठार करून त्यांच्या गाईला जखमी केले आहे. येथील परिसरात गेले पंधरा दिवस बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने याबाबत दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.येथील तांबेवाडी ही जंगलमय भागापासूननजिक आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतो. मे महिन्यामध्ये येथील शेतकरी विठोबा गोविंद परब यांच्या गायीवर वाघाने झडप घालून जबर जखमी केले होते. दरवर्षी येथील शेतकऱ्यांच्या एक ना एक जनावरांवर बिबट्या हल्ला करतो. रघुनाथ राणे यांचा वाडा जंगलापासून जवळच आहे. नेहमीप्रमाणे राणे यांनी सकाळी आपली गुरे चरावयास सोडली. काहीवेळाने राणे न्याहरी करण्यासाठी घरी आले. न्याहरी करून पुन्हा जनावरे राखण्यासाठी गेले असता जनावरे सैरावैरा पळू लागली. एक बैल सोडून सर्व जनावरे असल्याचे राणे यांच्या लक्षात येताच त्यांनी बैलाचा शोध सुरू केला. जवळच्याच एका झुडपाखाली बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. राणे यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने पळ काढला. तसेच एका गायीलाही जखमी केले. राणे यांनी इतर जनावरे घेऊन घर गाठले. याबाबत त्यांनी शेजारी राहणारे प्रताप राणे यांना सांगितले. प्रताप राणे यांनी दूरध्वनीवरून घटनेची कल्पना वनविभागाला दिली. हे वृत्त समजताच वनविभागाचे कर्मचारी कांबळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून त्यांनी १५ हजार रूपये रकमेचा बैल असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. संबंधित खात्याने या घटनेची दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)