शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग पाणीटंचाईमुक्त करणार

By admin | Updated: April 17, 2015 00:07 IST

अंकुश जाधव : २ कोटी ८७ लाखांच्या कामांना मंजुरी

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मधील आराखड्यात दोडामार्ग तालुक्यासाठी २ कोटी ८७ लाखाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच सभापतीपदाच्या कार्यकालापासून आतापर्यंत दोडामार्गात दहा कोटींची पाणीपुरवठाविषयक कामांना मंजुरी मिळाली असून संपूर्ण तालुका पाणीटंचाईमुक्त करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली.यासाठी मला जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच आदींचे सहकार्य लाभल्याची माहिती अंकुश जाधव यांनी दिली. तसेच मंजुरी दिलेल्या सर्व प्रस्तावाची वेळीच पूर्तता करण्यासाठी दोडामार्ग तालुक्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राणे यांनी विशेष लक्ष दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मधील आराखड्यात २ कोटी ८७ लाखाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मंजूर झालेल्या २ कोटी ८७ लाखांची कामे पुढीलप्रमाणे- मणेरी बाईतवाडी- १९ लाख २६ हजार ३००, हेवाळे घाटीवडे- १० लाख ४३ हजार १००, हेवाळे गावठणवाडी- १० लाख ४८ हजार, हेवाळे हरिजनवाडी- १२ लाख ४३ हजार, मणेरी इनामदारवाडी- १२ लाख ४२ हजार ८००, मांगेली देऊळवाडी- ११ लाख ९७ हजार १००, मोरगाव ब्रह्मपुरीवाडी- १२ लाख ३२ हजार ५००, मोरगाव हरिजनवाडी- १४ लाख ९५ हजार ७००, पिकुळे शाळेचीवाडी- १२ लाख २५ हजार ५००, तेरेखोल कुंभारवाडी- १२ लाख ४९ हजार ४००, तेरेखोल म्हावळणकरवाडी- १२ लाख ४८ हजार १००, वझरे गोडगाचीवाडी- १२ लाख ५१ हजार १००, विर्डी वरचीवाडी- १२ लाख ५९ हजार ९००, झरेबांबर गावठणवाडी- ११ लाख ३३ हजार ९०० (ही सर्व कामे सार्वजनिक विहिरीची आहेत.)बोडण नळपाणी पुरवठा योजना- २७ लाख १९ हजार ८००, फुकेरी घारपी नळपाणी पुरवठा योजना- २२ लाख ६ हजार ४००, विर्डी हरिजनवाडी नळपाणी पुरवठा योजना २८ लाख १८ हजार २००, झरेबांबर पालवाडी, चाळ््याचे भरड नळपाणी पुरवठा योजना- ३२ लाख १५ हजार ४०० असा निधी मंजूर झाला आहे. दोडामार्ग तालुक्यात मे अखेर काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना हा ग्रामस्थांना करावा लागतो. माझ्या सभापतीपदाच्या कारकिर्दीत पाणीपुरवठाविषयक १० कोटींची कामे झाली आहेत. तरी चालू वर्षात दोडामार्ग तालुक्यातील सर्व वाडी, वस्ती, टंचाईमुक्त करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)