शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वर सोडल यांना कायमस्वरुपी नेमा

By admin | Updated: February 3, 2015 23:54 IST

तोडणकर, आचरेकर यांची मागणी

मालवण : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ. ज्ञानेश्वर सोडल व भूलतज्ज्ञ डॉ. पराग नायगावकर यांना दोषी ठरविणे योग्य नाही. डॉ. सोडल व नायगावकर यांच्या पाठीशी मालवण नगरपालिका खंबीरपणे उभी असल्याचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सांगत डॉ. सोडल यांची एनआरएचएमअंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी सोमवारी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.कसाल येथील जयश्री शिंगाडे यांचा गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. सोडल आणि डॉ. नायगावकर यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप झाला. यावेळी बोलताना तोडणकर-आचरेकर द्वयी म्हणाले की, या प्रकारास डॉक्टरांना दोषी ठरविणे चुकीचे आहे. डॉक्टर म्हणजे देव नाही. डॉक्टर रुग्णासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. विविध तपासण्या व उपचार करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय उपकरणे व सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. मात्र, अशा सोयीसुविधा पुरविण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या घटनेस शासन जबाबदार आहे. काही वेळा एखादा रुग्ण आकस्मिकरीत्या बळी ठरू शकतो. डॉ. सोडल यांनी आजपर्यंत चांगली सेवा बजावली असून, हजारो शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)सरकारचे दुर्लक्ष : सुदेश आचरेकरसध्याचे भाजप-शिवसेनेचे सरकार रुग्णालयांमधील असुविधांबाबत गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येते. रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप सुदेश आचरेकर यांनी यावेळी केला. तसेच नुकतेच सिंधुुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करून गेलेले आरोग्य राज्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील रुग्णालयांना भेट दिली नाही. सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली नाही. यातच सर्वकाही दिसून येते, असेही आचरेकर म्हणाले.