शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘वितरण’चा ग्राहकांना जोरदार करंट

By admin | Updated: December 5, 2015 00:22 IST

तळेरेच्या ग्राहकाचे बिल तब्बल ३१ हजार : कासार्डे, साळीस्ते परिसरातही तीच स्थिती

नांदगाव : वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा अनेकवेळा वीज ग्राहकांना फटका बसत असल्याचा नेहमीचाच अनुभव आहे. तळेरे बाजारपेठ येथील एका ग्राहकाला चक्क महिन्याचे बिल ३१,०२० रुपयांचे देऊन कंपनीने जोरदार करंट दिला. यासह अनेकांना वाढीव वीजबिल आल्याचाही चर्चा ऐकायला मिळत आहे. आॅक्टोबरची वीजबिले भरमसाठ आल्याचे चित्र तळेरे, कासार्डे, साळीस्ते परिसरात दिसून येत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे अनेकांनी धाव घेतली आहे.वीज कंपनीचे काही वर्षापूर्वी दर तीन महिन्यांनी वीजबिल यायचे. त्यावेळी काही प्रमाणात वीजबिल व्यवस्थित असायचे. मात्र, त्यानंतर डिजिटल मीटर बसविण्यात आले आणि दर महिन्याला बिल येऊ लागले. याचा फायदा कंपनीला होऊ लागला. पूर्वी दर तीन महिन्यांनी येणारे वीजबिल आता तेवढेच दर महिन्याला येऊ लागले.तळेरे येथील एका वीज ग्राहकाचे तब्बल ३१ हजार, तर साळीस्ते येथील एका ग्राहकाचे १८ हजारांचे वीजबिल आले आणि ते हैराण झाले. ग्रामीण भागात घरगुती वापराचे एवढे बिल येऊ शकते का? एवढा साधार विचारही कंपनी करत नाही का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शिवाय नेहमीप्रमाणेच रीडिंगमध्ये गफलत असल्याचेही निदर्शनास येते. वीजबिलावरील मीटरचा फोटो तर नावालाच असल्याचे काही वीजबिलांवरील फोटो पाहून समजते. आर्थिक भुर्दंडडिजिटल मीटर हे वीज ग्राहकांच्या हिताचे न होता त्यांना आर्थिक भुर्दंड ठरत आहेत. अलीकडे वाढीव बिल येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तळेरे, साळीस्ते, कासार्डे परिसरातील ग्राहकांनी बोलून दाखविले. अशाप्रकारे वारंवार वाढीव बिलाचा भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.आंदोलन छेडण्याचा इशाराअशाप्रकारे दरवेळी ग्राहकांना सोसावा लागणाऱ्या भुर्दंडाविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. मागील वीजबिल नियमित भरलेले असतानाही काही ग्राहकांना एखादी मुदत संपल्यानंतरही वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही केली जाते. विशेष म्हणजे प्रामाणिक ग्राहकांनाच नियम दाखविला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.