शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

अपंग शेतकऱ्याने केली कलिंगडाची शेती

By admin | Updated: March 16, 2015 00:07 IST

बालवयातच नशीबी अपंगत्व आले कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घ्यायचे. या जिद्दीने शिक्षण पूर्ण झाल्यावर रुपेशने मंडणगड सोडले व दापोली तालुक्यातील दाभोळ - पंचनदी गाठले. तेथे

शिवाजी गोरे - दापोली -दोन्ही पायाने अपंग परंतु परावलंबी जीवन जगायचे नाही. आपण अपंग असलो तरीही मनगटात बळ आहे. त्या जोरावर इतरांप्रमाणे काम करु शकतो. अपंगत्त्व आले म्हणून रडत बसण्यापेक्षा त्यावर मात रुन जगू शकतो, अशी उमेद उराशी बाळगून अपंग शेतकरी रुपेश पवार यांनी दिवसरात्र कष्ट करुन जिद्दीने कलिंगड शेती केली आहे.बालवयातच नशीबी अपंगत्व आले असले तरीही कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घ्यायचे. या जिद्दीने गावातील शिक्षण पूर्ण झाल्यावर रुपेश पवार याने विने तालुका मंडणगड सोडले व दापोली तालुक्यातील दाभोळ - पंचनदी गाठले. तेथे मित्राच्या सहाय्याने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, नोकरी मिळाली नाही त्यामुळे निराश न होता गावातच शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यातच १२ वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झाले. म्हातारी आईची उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडली. दोन्ही पायाने अपंग असणारा रुपेश कुटुंबाचा पोशिंदा बनला.विने येथील २ एकर वडिलोपार्जित शेतीत भात- नाचणीचे पीक घेत असताना, दुबार पीक पद्धतीची कल्पना रुपेशच्या डोक्यात आली. केवळ भात पीक घेऊन थांबायचे नाही. आता उन्हाळी शेतीसुद्धा करायची, पावटा, चवळी पिक घेतले जाते. कोकणातील शेतकरी भातपीकावर समाधान मानतो. पेण, पनवेल व परप्रांतीय शेतकरी येवून मंडणगड तालुक्यात कलिंगड शेती करीत आहेत. आपणसुद्धा यावर्षी कलिंगड शेती करायची अशी खुणगाठ मनाशी बांधून, दोन एकर शेतीत कलिंगडाची गोल्डन जात लावण्याचे ठरवले.त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत कलिंगडाची गोल्डन जातीची लागवड केली. कृषी विभागाने मोफत खत, बियाणे, किटकनाशके पुरवली. त्यामुळे, आपण यशस्वी झालो अशी भावना त्यांच्या मनात आहे. परंतु त्याहीपेक्षा त्यांची जिद्द व सकारात्मक मानसिकता फार महत्त्वाची आहे.कलिंगड शेतीसाठी भांडवल नसतानासुद्धा रुपेशने दाखवलेले धाडसाचे गावकऱ्याने कौतुक केले. तसेच गावकऱ्याने रुपेशला आर्थिक मदत करण्याचे ठरवले. मित्र परिवार व गावकऱ्याने मिळून दोन एकरच्या कलिंगड लागवडीसाठी आर्थिक मदत केली. त्याच्या जोरावर पवार यांना हत्तीचे बळ मिळाले. अपंग असलो तरीही मनाने खंबीर असल्याचे रुपेशने गावकऱ्यांना दाखवून दिले.कलिंगड शेती करताना आई सरस्वती पवार, बहिण सुरेखा महाडीक, भाचा समीर महाडिक यांची मदत लाभली. कलिंगड शेतीबरोबर बीट, गाजर, वांगी, मका, काकडी याची लागवड करुन दुबार पीक पद्धतीचा प्रयत्न सुरु आहे. शेतीतील कलिंगड व भाजी मी स्वत: बाजारात जाऊन विकतो. कृषी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. आत्मा योजनेंतर्गत मदत मिळाली. वेळोवेळी प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावर्षी कलिंगडाचे चांगले उत्पन्न मिळेल असे वाटत असताना अचानक अवकाळी पाऊस झाला व आशेवर पाणी फेरले गेले.- रुपेश पवार, उत्पादक.