शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडियाचे स्वप्न सत्यात उतरल्याचे समाधान

By admin | Updated: January 4, 2016 00:35 IST

मधुकर चव्हाण : गेल्या २० वर्षात अनेकविध उपक्रमांतून शाळेचा कायापालट; अध्ययनात आमुलाग्र बदल

खेड : जिल्हा परिषद शाळा, कर्टेल ही एकेकाळची दुर्लक्षित असलेली शाळा होती. गेल्या २० वर्षात अनेकविध उपक्रमातून शाळेचा कायापालट करण्यात येथील ग्रामस्थांना यश आले, ही समाधानाची बाब आहे. आज ही शाळा डिजिटल झाल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययनात आमुलाग्र बदल घडणार आहे. डिजिटल इंडियाचे मनमोहन सिंग सरकारचे स्वप्न सत्यात उतरत असल्याने समाधान वाटत असल्याचे गौरवोद्गार मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी काढले.खेड शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्टेल गावातील आदर्श गाव डिजिटल शाळेचे उद्घाटन मधु चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. त्यांनी कर्टेल गावच्या सर्वांगिण विकासासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह त्याचे बंधू सभापती चंद्रकांत कदम यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करीत गावात मतभेद न करता केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमात विश्व समता राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रभाकर कोळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड पंचायत समिती सभापती चंद्रकांत कदम, शशिकांत चव्हाण, शंकर कांगणे, उपसभापती रवींद्र मोरे, जिल्हा परिषद सदस्य महिपत पाटणे, सरपंच महेंद्र कदम, समीर चव्हाण, प्रमिला चव्हाण, संजय हिंगावार, सुनील सावंत, अक्षता चव्हाण, ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक श्रीकांत चाळके आदी मान्यवर उपस्थित होते़ या डिजिटल शाळेसाठी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, पर्शुराम चव्हाण आणि वामन चव्हाण यांचे विशेष योगदान लाभले आहे. हा उपक्रम यशस्वी होणेसाठी शाखाप्रमुख उमेश चव्हाण, दीपक चव्हाण, दिनेश चव्हाण व मधुकर सावंत तसेच मिथुन गमरे, अनिल येलवे, जयवंत सावंत आदिंनी सहकार्य केले़ शाळेतील शिक्षिका प्रमिला राठोड, सुरसिंग ठाकरे, अनिल कालेकर, केंद्रप्रमुख दीपक बुरटे, संजय जाधव, विश्नाथ पवार, मंगेश वायकर, संदीप घाणेकर, पर्शराम पेवेकर यांच्यासह मुंबईहून आलेले शैलेश चव्हाण, राजेश चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, अजय जागडे, लवु चव्हाण, मनोहर चव्हाण, संतोष चव्हाण, अरविंद चव्हाण, संजय येलवे, रामचंद्र येलवे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)