शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचा विकास करणार : केसरकर

By admin | Updated: December 13, 2014 23:50 IST

सिंधुदुर्गात भव्य स्वागत : दोडामार्गचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

कसई दोडामार्ग : प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातूनच कोकणचा विकास करणार आहे. मंत्रिपद मिळाल्याचा पुरेपूर फायदा कोकणला करून देणार आहे. तुमच्या मेहनतीमुळेच मी आमदार व मंत्री झालो. त्याची परतफेड सर्वांना प्रेम देऊन आणि कोकणचा खऱ्या अर्थाने विकास करूनच करीन, असे प्रतिपादन वित्त, ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथील शासकीय दौऱ्यावेळी केले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केसरकरांचे आज, शनिवारी पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आगमन झाले. दोडामार्ग येथे पंचायत समितीच्यावतीने महालक्ष्मी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, सभापती महेश गवस, जिल्हा परिषद सदस्य विशाखा देसाई, तहसीलदार बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, पांडुरंग नाईक, रंगनाथ गवस, यशवंत आठलेकर, विजयकुमार मराठे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद दौऱ्याचे आयोजन करून समस्या जाणून घेतल्या. या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अधिवेशन संपताच तिन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषद मतदारसंघात दौरा करून प्रत्येक नागरिकाच्या समस्या, प्रश्न यांची माहिती घेऊन सोडविणार, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री केसरकर यांचे तालुक्यात आगमन होताच शिवसैनिक, भाजप, आरपीआय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी गांधी चौक येथे गर्दी झाल्याने काही वेळ वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. प्रकल्पग्रस्तांसाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारदोडामार्ग तालुका अतिदुर्गम आहे, विकासापासून दूर आहे. याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. घारपी, कुंभवडे, तेरवण, भेकुर्ली ही गावे अतिदुर्गम आहेत. कुंभवडे गाव चौकुळ ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी व तेरवण गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत, अन्य ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणार, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.