शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

अधिवेशनातील सत्य कामगिरी लोकांसमोर मांडा

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

नीतेश राणे : कोकणाबद्दल राज्यसरकारची भूमिका चिंताजनक

कणकवली : विधिमंडळ अधिवेशनातील प्रत्येकाच्या कामकाजाची नोंद असते. जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न सोडवल्याचे सांगून उगाचच सत्ताधाऱ्यांनी पाठ थोपटून घेऊ नये. सत्ताधाऱ्यांना लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिले आहे. आता सिंधुदुर्गातील जनतेची दिशाभूल थांबवावी, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. कोकणाबद्दल राज्यशासनाची भूमिका चिंताजनक असून १० हजार ५०० कोटींच्या पॅकेजमध्ये कोकणचा उल्लेखही नाही, असेही ते म्हणाले. ५०० कोटींचा निधी आणल्याचे सांगणारे पालकमंत्री केसरकर आणि मच्छिमारांचा प्रश्न सोडवल्याबाबत सत्कार स्विकारणारे आमदार वैभव नाईक यांनी विधीमंडळात केलेल्या कामाची नोंद उपलब्ध आहे. पालकमंत्र्यांनी खोटी माहिती दिल्याबद्दल हक्कभंग आणण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील एखाद्या अधिवेशनात त्याची माहिती मिळेल. पालकमंत्री केसरकर यांनी ‘आणलेल्या’ निधीबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागितली आहे. पारंपरिक मच्छिमारांची भूमिका मी एकनाथ खडसे यांच्याकडे मांडली. मच्छिमारप्रश्नी मी खडसे यांना भेटल्यावर आमदार नाईक यांची धावपळ सुरू झाली. त्यांना सगळ्यांची चिंता असल्यासारखे ते दाखवतात. वास्तविक कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलवून घेऊन मच्छिमारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे संवेदनशील प्रश्नावर आमदारांनी बालिशपणा करू नये. पालकमंत्री केसरकर यांनी ५०० कोटींचा निधी आणल्याचे सांगितल्याने मोंड-वानिवडे पुलाचे काम त्या निधीतून घेतले जावे अशी मागणी केली असता आमदार नाईक यांनी त्यास नकार देत नाबार्डमधून पूलाचे काम घेण्यास सांगितले. स्वत:च्या पालकमंत्र्यांवर नाईक यांचा विश्वास नाही. कोकणाने सरकारला २३ आमदार देऊनही आंबा-काजू नुकसानभरपाई, शेतकरी याकडे शासनाने लक्ष जात नाही, असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता येत्या अधिवेशनात या प्रश्नी २ तास चर्चा होणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गडचिरोलीत लवकरात लवकर डॉक्टर देण्याची भाषा केली. स्वत:चे गाव असणाऱ्या सिंधुदुर्गात जे वर्षभर डॉक्टर देऊ शकले नाहीत. ते मंत्री गडचिरोलीला तातडीने डॉक्टर देण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे, अशी टीका केली. (प्रतिनिधी)कणकवली पदाधिकाऱ्यांत बदलशहर संघटनेच्या बदलाचे संकेत दिल्याप्रमाणे आता शहर कॉँग्रेसची एक बैठक झाली असून शहराध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविण्यास सांगितली आहेत. पुढील टप्प्यात वॉर्डनिहाय बैठका होणार आहेत. लवकरच हे बदल दिसतील, असे नीतेश राणे यांनी सांगितले. दहा पट मोबदला हवाचौपदरीकरणात काही कुटुंबे आणि व्यावसायिक कायमचे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे त्यांना त्या पटीत मोबदला मिळायला हवा. चौपदरीकरणानंतर जमिनींचे भाव गगनाला भिडणार आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुंबईतील बैठकीत हवा तेवढा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. साडेतीन पट नाही तर दहा पट मोबदला मिळवून दिल्याशिवाय जमिनीला हात लावू देणार नाही, अशी भूमिका राणे यांनी मांडली.- नीतेश राणे, आमदार, कणकवली