शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र पाली तालुक्याची मागणी

By admin | Updated: September 24, 2015 23:51 IST

नाडकर्णी अहवाल : कोकण, घाट यांना जोडणारा परिसर

पाली : रत्नागिरी तालुक्यातील मौजे पाली हे गाव कोकण व घाट यांना जोडणारा एक महत्वाचा परिसर आहे. पर्यटनदृष्ट्या विकसित होऊ शकणाऱ्या पाली गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत एक सदस्यीय होकारार्थी नाडकर्णी अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे.  आंबाघाट उतरुन आल्यावर निसर्गाची खास अदाकारी आंबाघाट, साखरपा, पाली परिसर पाहिल्यावर दृष्टीस पडते. वास्तविक हा भाग पर्यटनक्षेत्र म्हणून यापूर्वीच घोषित व्हायला पाहिजे होता. यासाठीही पाली भागातील सामाजिक कार्यकर्ते कै. विश्वनाथ सावंत यांची पूर्वीपासूनची मागणी होती. परंतु, त्या मागणीकडे दुर्लक्ष करणेत आले असून, गेली कित्येक वर्ष पाली हा एक टूमदार तालुका व्हावा यासाठीही येथील जुने-जाणते दलितमित्र समाजसेवक कै. मुकुंदराव सावंत व त्यांचे पुत्र कै. विश्वनाथ सावंत, सिद्धराज सावंत यांचे अनेक वर्ष शासनदरबारी प्रयत्न सुरु होते व आजही सुरु आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले असताना रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा झाला. त्याचवेळी वैभववाडी हा तालुका झाला. सुमारे ३० ते ३५ गावांचा हा छोटा तालुका त्यावेळी निर्माण झाला. तसेच त्यानंतरही काही तालुक्यांची निर्मिती झाली. पाली तालुका अथक प्रयत्न करुनही अद्याप झालेला नाही. वास्तविक वैभववाडी तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांपेक्षाही जादा गावे पाली तालुक्याच्या निर्मितीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. पाली तालुक्यात येणारी गावे क्षेत्रफळाने मोठी असतानाही तसेच उत्पन्नाने व महसुलाने मोठी असताना देखील अद्याप पाली हा तालुका झालेला नाही. नव्या सरकारने पाली तालुका निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)पाली येथे महसूल खात्याची स्वत:च्या मालकीची जागा असून, सर्कल कार्यालय आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचीही पाली येथे जागा आहे. महावितरणचीही येथे जागा असून, तेथे त्यांचे युनिट, कार्यालय आहे. एस. टी.चेही येथे टूमदार बसस्थानक आहे. पोस्ट कार्यालय, वनखाते, बँका, सोसायट्या, पतसंस्था, पोलीस स्टेशन, बाजारपेठ आदी असून, येथे आठवडा बाजारही भरतो.