शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘दीपसंध्या’ने रसिक मंत्रमुग्ध

By admin | Updated: November 13, 2015 23:41 IST

सूरमय संध्याकाळ : कणकवलीत युवारंजन कलामंचचे आयोजन

कणकवली : आली माझ्या घरी ही दिवाळी..., सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती.. अशा एकाहून एक सरस गीतांनी कणकवलीवासीयांची संध्याकाळ सूरमय झाली. निमित्त होते... युवारंजन कलामंचने आयोजित केलेल्या ‘दीपसंध्या’ या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात संगीतरसिक मंत्रमुग्ध होऊन गेले.कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर दिवाळीचे औचित्य साधून ‘दीपसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचा प्रारंभ कणकवली शिक्षण संस्थेचे चेअरमन सुरेश कामत यांच्या हस्ते केला. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अक्षरसिंधू कलामंचचे संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण, प्रा. हरिभाऊ भिसे, महानंद चव्हाण, डी. पी. तानावडे, दीपक बेलवलकर, अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, उदय सर्पे, महेश काणेकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमातील गीतकारांना शेखर सर्पे, अमित रगजी, प्रथमेश पेडणेकर, प्रसाद धुमाळ, महेंद्र्र मांजरेकर, संतोष मोहिते, प्रमिल इसवलकर, अश्विन जाधव यांनी संगीत साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. अविट गोडीची गाणी युवारंजन कलामंचच्या कलाकारांनी सादर करून कणकवलीवासीयांची संध्याकाळ यादगार बनविली. (वार्ताहर)सुश्राव्य गीतांचा नजराणा‘प्रथम तुला वंदितो, सांज ये गोकुळी, शुक्रतारा मंद वारा, धुंदी कळ्याना, रूपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, मेंदीच्या पानावर, या जन्मावर, मी वाऱ्याच्या वेगाने, जेव्हा तुझ्या बटाना, वृंदावणी वेणु अशा सुश्राव्य गीतांचा नजराणा प्रमिल इसवलकर, अभी मेस्री, डॉ. निशा धुरी, प्रियांका मुसळे, राकेश मिठबावकर या गायकांनी रसिकांसमोर सादर केला.