शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

तारण सोन्यामुळे सहकारी बँकांचे मरण

By admin | Updated: November 16, 2014 00:23 IST

आधीच उल्हास त्यात सोने दरकपात : हमखास परतफेडीच्या कर्जांमध्येच सहकारी बँका, पतसंस्थांना फटका

मनोज मुळ्ये / रत्नागिरीसर्वच क्षेत्रातील कर्जपुरवठ्याची गती मंदावलेल्या काळात सहकारी बँका आणि पतसंस्थांना तारणहार ठरलेला सोनेतारण कर्जाचा पर्यायही आता धुसर झाला आहे. बाजारातील सोन्याचे दर कमी झाल्यामुळे आधीच्या दरानुसार मोठा कर्जपुरवठा केलेली प्रकरणे आता बँकांना तोट्याची ठरू लागली आहेत. कर्जदारांनी हप्ते भरले नाहीत तर बँकांना या आर्थिक वर्षात मोठा तोटा सोसावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आधीच मोडकळीस आलेल्या पतसंस्था आता या दर कपातीमुळे पुरत्या हवालदिल झाल्या आहेत. एका बाजूला वाढणाऱ्या ठेवी आणि दुसऱ्या बाजूला कमी होत जाणारी कर्ज प्रकरणे यामुळे सहकारी बँका आणि पतसंस्थांचे ताळमेळ बिघडले आहेत.गेल्या एक-दोन वर्षापासून सर्वच प्रकारच्या कर्जप्रकरणांचा वेग मंदावला आहे. गृहनिर्माण कर्ज हे हमखास परतफेड होणारे कर्ज. राष्ट्रीयकृत बँकांच्या कागदपत्रांच्या कटकटीतून वाचण्यासाठी अनेक लोक सहकारी बँका किंवा पतसंस्थांकडूनही गृहकर्ज घेतात. त्यावरील व्याज हा बँकांच्या उत्पन्नातील मोठा वाटा. मात्र गेल्या काही काळात या कर्जांचा वेग मंदावला आहे. जागांचे वाढलेले दर परवडत नसल्याने गृहखरेदीचा वेग मंदावला आहे. त्यातच घर ही गोष्ट प्रत्येकजण एकदाच घेतो. पाच वर्षांपूर्वी गृहकर्जाला मोठी मागणी होती. आता ती कमी झाली आहे.वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आता कंपन्यांकडूनच शून्य टक्के व्याजदराचे आमीष दाखवून हप्त्यावर विक्री केली जात आहे. त्यामुळे बँकांकडून होणारी चारचाक गाड्यांची कर्जप्रकरणेही आता कमी झाली आहेत. उद्योग क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत नसल्याने छोट्या उद्योगांची वाढ खुंटली आहे. साहजिकच त्या प्रकारच्या कर्जांनाही मर्यादा आली आहे.या एकूणच मंदीमध्ये सोनेतारण कर्ज हा अनेक सहकारी बँका आणि पतसंस्थांसाठी नफा मिळवण्याचा मार्ग होता. सोन्याचा दर जेवढा असेल त्याच्या ७५ ते ८0 टक्के इतकेच कर्ज दिले जात असल्याने कर्जाची परतफेड झाली नाही तरी बँकांना तोटा होत नव्हता. मात्र आता सोन्याचे दर झपाट्याने आणि दखल घेण्याइतके कमी झाले आहेत. त्यामुळे गतवर्षी ज्यांनी सोने दर अधिक असताना कर्ज घेतले होते, त्यांच्या तारण ऐवजाची बाजारातील किंमतच आता घटली आहे. दर कमी झाल्यामुळे नव्याने होणाऱ्या प्रकरणांची संख्या तेवढीच असली तरी कर्जाची रक्कम कमी झाली आहे. त्याचा फटका बँका आणि पतसंस्थांना बसणार आहे.ज्या कर्जामध्ये ९0 दिवसात एकही हप्ता भरला जात नाही त्याचा समावेश एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) मध्ये केला जातो. तेवढ्या रकमेची तरतूद बँकेला आपल्या नफ्यातून करावी लागते. त्यामुळे बँकेचा नफा कमी होतो. आताच्या घडीला जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांकडील सोनेतारण कर्जे एनपीएमध्ये गेली आहेत.सद्यस्थितीत केवळ पगारदारांच्याच कर्ज योजनेला प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे आता त्याची मर्यादा वाढवण्याचा विचार केला जात आहे.प्रत्येक क्षेत्रातच कर्जाची मागणी घटली असून, आणखी दोन-तीन वर्षे ही परिस्थिती अशीच राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ज्या सक्षम बँका आणि पतसंस्था आहेत, त्याच यातून तरून जातील. पण ज्या पतसंस्थांचे व्यवहारच सोनेतारण कर्जावर अवलंबून आहेत, त्या पतसंस्था पूर्णपणे मोडकळीस येण्याची भीती आहे.