शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कुर्लीतील जखमी सांबराचा अखेर मृत्यू

By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST

वनरक्षक, वनपाल यांचा संप : मुक्या प्राण्याला गमवावा लागला जीव

कणकवली : कुर्ली भातडेवाडी येथे डोंगरालगतच्या मानवी वस्तीत जखमी अवस्थेत शिरलेल्या सांबराचा गुरुवारी जानवली येथील वन विभागाच्या कार्यालयात अखेर मृत्यू झाला. वनरक्षक तसेच वनपालांच्या संपामुळे या जखमी सांबरावर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे या मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागला. त्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.कुर्ली गावच्या पूर्व दिशेस दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात गवा रेडे, हरिण, सांबर, बिबटे आदी वन्य प्राणी आढळून येतात. बुधवारी कुर्ली भातडेवाडी या डोंगरालगतच्या नर जातीच्या सांबरावर चार ते पाच रानकुत्र्यांनी (कोळसुंद्ये) जोरदार हल्ला केला. या रानकुत्र्यांपासून जीव वाचविण्यासाठी ते सांबर मानवी वस्तीत शिरले. हे सांबर दीपक कदम तसेच चंदू कदम यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी इतर ग्रामस्थांना बोलावून घेतले. तसेच त्या सांबराची रानकुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. शाहू कदम, बाबू कदम आदी ग्रामस्थांनी त्या सांबराला दोरखंडाच्या सहाय्याने झाडाला बांधून ठेवले होते. सरपंच अंबाजी हुंबे, उपसरपंच सूर्यकांत पाटील, पोलीस पाटील प्रदीप पाटील आदी ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. या जखमी सांबराचे एक शिंग मोडून पडले होते. तर पुढच्या पायाला व मानेखाली जखम झाली होती. मागच्या दोन्ही पायांनाही रानकुत्र्यांनी चावा घेतल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. या घटनेबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मात्र, वन मजूरांव्यतिरिक्त तेथे कोणीही फिरकले नाहीत. वनरक्षक तसेच वनपालांचा संप असल्यामुळे ते याठिकाणी आले नसल्याचे समजते. जखमी अवस्थेतील सांंबरावर गुरुवारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. ग्रामस्थांच्या मदतीने वनमजूरांनी या सांबराला डोंगरमय भागातून खाली आणून ट्रॅक्टरमध्ये घातले. तसेच दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहरानजिक असलेल्या जानवली येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. मात्र, काही वेळातच या सांबराचा मृत्यू झाला. या सांबराचे शुक्रवारी शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दरम्यान, या जखमी सांबरावर वेळीच उपचार झाले असते तर त्याचे प्राण वाचले असते. वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मानवी चुकांमुळे वन्य प्राण्यांना जीवास मुकावे लागत असल्याने कणकवली तालुक्यासह परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)