शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

धरणाचे दरवाजेच उघडले

By admin | Updated: March 16, 2015 00:10 IST

खेडमधील घटना : बुडून मृत्यू झाल्यानंतर अज्ञातांचे कृृत्य

खेड : तालुक्यातील बोरज येथील धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर धरणातील पाणी दुषीत झाल्याचा शोध लावून अज्ञातांनी चक्क या धरणाचा दरवाजाच उघडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असतानाच केलेल्या कृ त्याबद्दल तालुक्यात संतापाचे वातावरण असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बोरज येथील धरणात मित्रासह पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र यामुळे धरणाचे पाणी प्रदुषित झाले असा जावईशोधच काही ग्रामस्थांनी लावला. एवढेच नव्हे, तर याच ग्रामस्थांनी धरणाचा दरवाजाही उघडला त्यामुळे सध्या ५० टक्के पाणीसाठा असलेल्या धरणातील पाणी वेगाने बाहेर पडू लागले.पाण्याचा वेग एवढा होता की त्यानंतर दरवाजे बसवणे व वाहणारे पाणी थांबवणे कोणालाच शक्य झाले नाही. जवळपास ६ ते ७ तास हे धरण वाहत होते. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालवली आहे.या धरणाची मालकी नगर परिषदेची आहे. त्यामुळे पालिकेने याबाबतची माहिती खेड पोलीस स्थानकात दिली आहे. खेड नगर परिषदेच्या कनिष्ठ पाणीपुरवठा परीवेक्षक सोनाली खैरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात ग्रामस्थांवर खेड पोलीसांनी भा.दं.वि. कलम ४३० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे भीषण पाणीटंचाईचे संकट समोर उभे असताना अज्ञातांनी केलेल्या या कृ त्याबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञाताचा शोध घेत आहेत. बोरज धरणातील पाणीसाठा या कृत्यामुळे कमी झाला आहे. त्यामुुळे खेड शहरासह चारही गावांना यंदा लवकर पाणीटंचाई जाणवणार आहे. (प्रतिनिधी)खेडसह चार गावांना फटकाखेड शहरापासून ७ कि.मी. अंतरावर बोरज गावानजीक हे ब्रिटीशकालीन धरण आहे. याच धरणाच्या पाण्यावर बोरज, निगडे, शिवखुर्द, शिवबुद्रुक या चार गावांच्या नळपाणी योजनाही अवलंबून आहेत. एप्रिल अखेरपर्यंत या धरणाचे पाणी खेड शहरासह या चार गावांना पुरते. या गावांना यावर्षी पाणीटंचाईचा लवकर फटका बसण्याची शक्यता आहे.