शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळमधील २५ घरे शासन बंधणार

By admin | Updated: June 30, 2015 00:18 IST

अनंत गीते : घरांसाठी शासकीय जागा उपलब्ध

रत्नागिरी : दाभोळ - टेमकरवाडी येथे दरड कोसळून नुकसान झालेल्या पाच घरांसह तेथील २५ घरे दाभोळमधीलच शासकीय जागेत बांधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी इंदिरा आवासमधील ५ टक्के निधीही वापरला जाणार आहे. तसेच काही दात्यांकडूनही मदत घेतली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केली. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दाभोळमध्ये दरड कोसळून तीन घरे पूर्णत: नष्ट झाली, तर दोन घरांचे अर्धवट नुकसान झाले. यातील ५ मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख प्रमाणे शासकीय मदत वितरीत करण्यात आली आहे. तसेच घरांसाठी प्रत्येकी १ लाख अशी तीन लाख मदतही देण्यात आली आहे. मृतांपैकी एकाचा अपघात विमा उतरवलेला होता. त्यामुळे त्याच्या वारसाला १ लाख रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान विमा योजनेतही एका मृताचे नाव असल्याने त्याच्या वारसाला १ लाख रुपये भरपाई मिळणार आहे. दाभोळ दुर्घटना ठिकाणच्या २० घरातील रहिवाशांना अन्यत्र हलवण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार ८ कुुटुंबियांना अन्य घरात हलविण्यात आले आहे. याच ठिकाणी भारती शिपयार्ड कंपनीच्या क्वार्टर्स असून, अन्य कुटुंबांना त्या क्वार्टर्समध्ये हलवण्यासाठी कंपनीकडे प्रयत्न सुरू आहेत, असे गीते म्हणाले. जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक आज झाली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, उदय सामंत आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा १ साठी ८८ किलोमीटर्स रस्त्यांना मंजुरी असून, त्यासाठी ५० कोटी मंजूर आहेत. पैकी साडेसात कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. यंदा निधीच नसल्याने नवीन प्रस्ताव पाठविलेच गेले नाहीत. निधी कमी आहे, असे सांगितले जात आहे, खरे काय, असे विचारता गीते म्हणाले, खरेतर युपीए सरकार असताना राज्यांना करपरतीपोटी विकासाकरिता ३२ टक्के परतावा मिळत होता. मोदी सरकारच्या काळात ३२ टक्क्यावरून हा नीधी ४२ टक्क्यांवर नेण्यात आला असून, निधी वाढला आहे. तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाचे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)३६ कुपोषित मुले...एप्रिल २०१४ पासून आतापर्यंत जिल्ह्यात ३६ कुपोषित बालके आढळून आली आहेत. ही संख्या वर्षअखेरपर्यंत आणखी वाढण्याची भीती असली तरी जिल्हा कुपोषणमुक्त करू. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक भागातील आमदार लक्ष देणार आहेत.