शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘नगरसेवका’साठी भाऊगर्दीने रंगत वाढली

By admin | Updated: March 27, 2016 01:00 IST

निवडणुकीत स्थानिकांसह युवावर्गाला प्राधान्य : अपक्ष, बंडखोरांमुळे राजकीय पक्षांची कसोटी, निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष

रजनीकांत कदम, कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांची झालेल्या भाऊगर्दीचा फटका अनेकांना बसणार तर आहेच पण त्याचबरोबर पक्षांतर्गत बंडखोरीचे संकटही राजकीय पक्षांवर ओढवणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलीच सत्ता रहावी यासाठी राजकीय पक्षांची कसोटी नगरपंचायत निवडणुकीत लागली आहे. छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात आता ९१ अर्ज असून माघारीपर्यंत यामध्ये फार मोठा असा फरक पडणार नसल्याचेही उघड आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतीची पहिली निवडणूक इच्छुकांच्या भाऊगर्दीसह अपक्ष व बंडखोर यांच्यामुळे रंगतदार बनली असून जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत झालेल्या रूपांतराने प्रशासनाचा कुडाळकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. शिवाय शहराचा विकासही आता नगरप्रशासन खात्याकडून होणार असल्याने नगरपंचायतीचे रूपांतर शहराच्या विकासाला गती आणण्याची शक्यता आहे. साहजीकच गावातून शहराकडे वळलेल्या कुडाळात स्थानिक कार्यकर्त्यांचीही कॉलर ताठ झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार इतिहास जमा होत असताना, नगरपंचायतीच्या इतिहासात नवनगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. याची परिणीती म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात ९१ उमेदवार उभे ठाकले आहेत. नगरसेवक पदासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची तशी तयारी गेल्या सहा महीन्यापासूनच सुरू होती. राजकीय पक्षांनीही त्यांचा वापर करण्याचा फंडा वापरल्यानेच एका प्रभागात अनेक उमेदवार निर्माण झाल्याचे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षातून इच्छुकांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची ही मोठी समस्या बनुन राहीली. त्यामुळे उमेदवारी देताना अनेक ठिकाणी वादावादी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक प्रभागात बंडखोरीचे संकट राजकीय पक्षांवर ओढवले आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणकीत भाजप व शिवसेना स्वबळाचे अस्त्र वापरून रिंंगणात उतरणार आहेत. काँग्रेसमध्ये आघाडी, युतीत बिघाडी अपक्षांसह बंडखोरीची तलवार छाननी नंतर ९१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. माघारीची तारीख ४ एप्रिल असून तोपर्यंत राजकीय पक्षांना वाढलेल्या उमेदवारांना आवर घालण्याची कसरत करावी लागणार आहे. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे अनेक उमेदवार असून त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना देण्यात आलेली आश्वासने यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे बंडखोरी टाळता येणे अशक्य असल्याचे चित्र आहे. तर या निवडणुकीत अपक्षांचा झालेला शिरकावही सर्वच पक्षांना मारक ठरणारा असून यामुळे पक्षपदाधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. त्यामुळे बंडखोरी व अपक्षांची टांगती तलवार घेऊनच या निवडणुकीत राजकीय पक्षांना उतरावे लागणार आहे.