शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

वैभववाडीत गटाराचे काम सुरू

By admin | Updated: December 20, 2014 23:21 IST

पहिल्या टप्प्यात १0 लाख रुपये मंजुर

वैभववाडी : कित्येक वर्षाची मागणी असलेल्या वैभववाडी बाजारपेठेतील बहुप्रतिक्षित बंदिस्त गटाराच्या कामाला अखेर शनिवारी सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १0 लाख रुपये मंजुरी मिळालेल्या अंदाजपत्रकातून सुमारे २४0 मिटर गटाराचे बांधकाम हाती घेण्यात आले आहेत. बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा टप्प्याटप्प्याने गटाराचे काम पूर्ण केले जाणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. वैभववाडी बाजारपेठेतील मासळी बाजारापासून संपूर्ण पाणी पावसाळ्यात संभाजी चौकापर्यंत वाहून येते. हे पाणी जागोजागी डबक्यांमध्ये साचल्यामुळे दुर्गंधी पसरुन नागरिकांना त्रास होत होता. त्यामुळे १0 लाखाच्या अंदाजपत्रकाला दोन वर्षापूर्वी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, कामासाठी निधी नसल्यामुळे आधीच्या ठेकेदाराने वर्षभरापूर्वी मक्ता रद्द केला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने फेरनिविदा काढली होती.दरम्यानच्या काळात रस्त्याच्या बाजूपट्टी लगत बसस्थानकापासून गटार खोदून ठेवल्यामुळे पावसाळ्यात अनेक वाहनांसह विद्यार्थी व नागरिकांना फटका बसला होता. त्याबाबत वृत्तपत्रांनी वारंवार बांधकामचे लक्ष वेधल्यानंतर आता २४0 मिटर लांबीच्या बंदिस्त गटार बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. बाजारपेठेच्या पूर्व बाजूला दत्तमंदिरपासून गटाराचे खोदकाम सुरु करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटाराचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे ३0 ते ३५ लाख निधीची आवश्यकता आहे.भविष्यातील संभाव्य रस्ता रुंदीकरणाची शक्यता विचारात घेवून बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही नागरिकांच्या इमारतीसमोरील अनधिकृत पत्र्याची शेड गटार बांधकामात जाण्याची शक्यता आहे. परंतु बांधकाम विभागाने बंदीस्त गटाराच्या कामाला प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सुरुवात केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)