शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सोनाळी येथे काँग्रेस-शिवसेना कार्यकर्ते भिडल

By admin | Updated: March 17, 2015 00:21 IST

तुफान दगडफेक : सात जणांवर गुन्हे ; वैभववाडीत तणाव

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : सोनाळी येथील काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते वैभववाडी शहरात रविवारी रात्री तीनदा समोरासमोर भिडले. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांवर तुफान दगडफेकही केली. त्यामुळे शहरात तणावाची स्थिती होती. तासाभराने पोलिसांनी जमावाला पांगवून वातावरण शांत केले. या प्रकारानंतर परस्परविरोधी तक्रारींवरून माजी सभापती अरविंद रावराणे, सोनाळीचे सरपंच प्रकाश शेलार, पोलीसपाटील राजेंद्र रावराणेंसह सातजणांवर अदखलपात्र गुन्हे नोंदविले आहेत.येथील वैभवलक्ष्मी पेट्रोल पंपावर सोनाळीतील राजकीय हाणामारीची ठिणगी पडली. शिवसेना कार्यकर्ता अनिल ऊर्फ बारक्या कदम आणि काँग्रेस नेते माजी सभापती अरविंद रावराणे यांच्यात रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास हातापायी झाली. त्यावेळी सरपंच प्रकाश शेलारही त्यामध्ये सहभागी होते. पंपावरील घटनेनंतर अनिल कदम याने पोलीस ठाणे गाठल्यानंतर १० ते १५ मिनिटांतच रावराणेंचे कार्यकर्ते सोनाळीतून वैभववाडी शहरात दाखल झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.पोलीस ठाण्याच्या आवारात दगडफेकअनिल कदम हा मारहाणीची तक्रार देत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात भिडले. तेथील अपुऱ्या उजेडाचा फायदा घेत जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतानाही एकमेकांवर त्यांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीनंतर वातावरण आणखीनच तापले होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीचा वापर करून पोलीस ठाण्याच्या आवारातील जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. पोलीसठाण्याच्या आवारातून सेना-काँग्रेस कार्यकर्ते संभाजी चौकात दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यात हाणामारी झाली. सातजणांवर अदखलपात्र गुन्हेशिवसेना कार्यकर्ता अनिल कदम याने दिलेल्या तक्रारीनुसार कदम पेट्रोल पंपावर असताना माजी सभापती अरविंद रावराणे व सरपंच प्रकाश शेलार यांनी तू आम्हाला पाहून का थुंकलास, असे विचारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार अनिल कदमने दिली आहे. तर आपण पेट्रोल पंपावरून जात असताना अनिल कदमने दुचाकी माझ्या गाडीसमोर आडवी लावून तू काय समजतोस, अशी भाषा वापरत शर्ट पकडून धक्काबुक्की केली, अशी तक्रार अरविंद रावराणे यांनी दिली आहे. तर पोलीस ठाण्याच्या आवारातून हुसकावल्यानंतर संभाजी चौकात पोलीस पाटील राजेंद्र रावराणे, दीपक कारेकर, समाधान जाधव व मनोहर तळेकर यांनी रवींद्र सुतार याला गावात आल्यावर ठार मारू, अशी धमकी दिली. तशी रवींद्र सुतारने पोलिसांत तक्रार दिली आहे. अरविंद रावराणे, प्रकाश शेलार, अनिल कदम, राजेंद्र रावराणे, दीपक कारेकर, समाधान जाधव, मनोहर तळेकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.निमित्त सोसायटी निवडणुकीचेसोनाळी गावातील राजकारणावर अरविंद रावराणे यांचा प्रभाव राहिला आहे. येथे झालेल्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेने पॅनेल केले होते. तरीही अरविंद रावराणेंच्या पॅनेलने सर्व जागांवर अल्प मताधिक्क्याने विजय मिळविला. त्यामुळे सेना-काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांवर लक्ष ठेवून होते. त्यातच चव्हाट्यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार केला गेला. त्यातूनच ही घटना घडल्याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.