शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी नगरपंचायतीवर काँग्रेसचाच झेंडा

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

युतीचा भ्रमनिरास : विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांसह केला स्वतंत्र गट

सिंधुदुर्गनगरी : बहुचर्चित वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत सात जागा मिळवून जास्त नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसने ग्रामविकास आघाडीचे स्वप्नील इस्वलकर व अपक्ष उमेदवार रवींद्र रावराणे यांना बरोबर घेऊन मंगळवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासमोर नऊ सदस्यांचा ‘वैभववाडी नगरविकास आघाडी’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामुळे काँग्रेस गटाने दोन तृतीयांश बहुमत पूर्ण केल्याने या नगरपंचायतीवर काँग्रेसचाच नगराध्यक्ष बसणार आहे. त्यामुळे महायुती व ग्रामविकास आघाडीच्या एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या आशेवर पाणी फिरले आहे. अद्याप नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले नसले तरी वैभववाडी नगरपंचायतीवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार असल्याचे सद्यस्थितीवरून तरी निश्चित झाले आहे. वैभववाडी नगरपंचायतीच्या यापूर्वी चार जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १३ जागांसाठी १ नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर २ नोव्हेंबरला मतमोजणी झाली होती. १७ पैकी काँग्रेस ७, महायुती ६ व ग्रामविकास आघाडीचे ४ उमेदवार आले होते. त्यामुळे वैभववाडीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते.दरम्यान, ग्रामविकास आघाडीच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सुचित्रा कदम यांनी आपण काँग्रेसला पाठिंबा दिला नसल्याचे जाहीर केल्याने काँग्रेसच्या गोटात तणावाचे वातावरण होते. काँग्रेसला सर्वाधिक सात जागा मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसमध्ये वेग आला होता. मंगळवारी अपक्ष व ग्रामविकास आघाडीच्या प्रत्येकी एक अशा दोन उमेदवारांसह एकूण नऊजणांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि वैभववाडी नगरपंचायतीवर काँग्रेसचीच सत्ता असण्यावर शिक्कामोर्तब केले. या वैभववाडी विकास आघाडी गटामध्ये संपदा शिवाजी राणे (गटनेत्या), उत्तम मुरमुरे, अक्षता जैतापकर, संजय चव्हाण, शोभा लसणे, समिता कुडाळकर, रवींद्र रावराणे (अपक्ष) व स्वप्नील इस्वलकर (ग्रामविकास आघाडी) यांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रत्येक उमेदवारांंचे ओळखपत्र तपासून त्या उमेदवारांची मान्यता असल्याचे पाहिले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, सुरेश सावंत, नासीर काझी, युवक काँग्रेस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड उपस्थित होते.(प्रतिनिधी)...तर नगराध्यक्षपद रिक्त राहीलवैभववाडी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी अपक्ष व ग्रामविकास आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याची मदत घेऊन दोन तृतीयांश बहुमत मिळविले आहे. आता नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सर्वजण वाट पहात आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडले तर काँग्रेसने स्थापन केलेल्या गटात या आरक्षणाचा उमेदवार नसल्याने ते पद रिक्तच राहण्याची शक्यता आहे.सत्ता स्थापनेसाठी वाट पहावी लागणारमहाराष्ट्र राज्य स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ अंतर्गत गट स्थापन करायचा झाल्यास ३० दिवसांच्या गटाची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांसमोर घ्यायची असते. त्यानंतर कुठलाही सदस्य फुटून गेल्यास त्याच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई करण्यात येते. तर गटात कुठला सदस्य यायचा असेल तरी त्याला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मान्यता घ्यावी लागते. काँग्रेसने स्थापन केलेल्या नऊ सदस्यीय गटामुळे वैभववाडी नगरपंचायतीतील सत्ता स्थापनेसाठीचे आवश्यक दोन तृतीयांश बहुमत मिळविले आहे. निवडणूक आयोगाकडून आरक्षण व नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम येईपर्यंत काँग्रेसला सत्ता स्थापनेची वाट पहावी लागणार आहे.