शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

आचऱ्यातील संघर्ष; २५0 जणांवर गुन्हे

By admin | Updated: November 2, 2015 00:28 IST

पाच अटकेत : राज्य राखीव दल तैनात

मालवण : आचरा बंदरात स्थानिक मिनीपर्ससीन व पारंपरिक मच्छिमार यांच्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार चकमकीत आचरा पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे, तर अन्य २०० ते २५० मच्छिमारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्य संशयित मच्छिमारांचा शोध सुरू असून, काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आचरा येथे राज्य राखीव पोलीस बल, राखीव सुरक्षा दल यांच्या सशस्त्र पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण वातावरण होते. दरम्यान, रिहान युसूफ मुजावर (आचरा-जामडूलवाडी) यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गैरकायदा जमाव करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा करून गंभीर दुखापतीस कारणीभूत तसेच घरात घुसून मारहाण व तोडफोड करीत किनाऱ्यावरील बोटी, जाळी पेटवून दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात शनिवारी रात्री उशिरा हर्षद चोडणेकर (वय २७, तोंडवळी), परशुराम प्रभू (३३, तोंडवळी), धनाजी कुमठेकर (४१, आचरा पिरावाडी), अमित हुर्णेकर (४०, वायरी-मालवण), अशोक कांदळगावकर (५०, आचरा पिरावाडी) यांना अटक केली आहे. रिहान मुजावर यांनी दिलेल्या तक्रारीत शनिवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान, पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी जमाव केला. यावेळी पारंपरिक मच्छिमार व पर्ससीन (पान ९ वर) मासेमारी वादाच्या कारणावरून जीवघेणा संघर्ष घडला. जमावाने दांडे, लोखंडी शिगा, बर्फ भरायचे लोखंडी खोरे, दगड, आदींनी हल्ला केला. यात सकलीन मुजावर, अबुवकर मुजावर, शाईन मुजावर, इम्रान काझी व महिला, कामगार जखमी झाले, तर ‘राडा’ रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही जमावाने जखमी केले. किनाऱ्यावरील महेश तोडणकर, आसिफ मुजावर यांची बोट, जाळी, फिश फायंडर, आदी मासेमारी साहित्य पेट्रोल टाकून या जमावाने पेटवून दिले. मासे उतरणी केंद्र्रावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान करीत इम्रान काझी, अनंत तारी यांच्या घरात घुसून घरातील सदस्यांना मारहाण व साहित्याची तोडफोड केली. अर्ध्या तासाच्या या चकमकीत सुमारे ५० लाखांहून अधिक किमतीचे नुकसान झाले असल्याचे मुजावर यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)  

नुकसानीचा पंचनामा आचरा पोलिसांनी नारायण कुबल, छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, धर्माजी आडकर यांच्यासह २०० ते २५० जणांच्या जमावाविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा व गंभीर दुखापतीस कारणीभूत, घरात घुसून मारहाण, तोडफोड, जाळपोळ व दगडफेक केल्याप्रकरणी तसेच ५० लाख रुपये किमतीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र्र शिंदे अधिक तपास करीत आहेत. रविवारी हल्ल्याच्या ठिकाणी नुकसानीचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आला.