शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीने कटुता संपते : सोनिया कानशिडे

By admin | Updated: December 13, 2014 23:49 IST

कणकवलीत लोकअदालत : तालुका विधी समितीच्यावतीने आयोजन

कणकवली : लोकअदालतीमध्ये परस्पर सहमतीने प्रकरण निकाली निघते. त्यामुळे कोणाचा एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव असे न होता दोघांचेही समाधान होते. त्यामुळे नात्यांमधील कटुता संपते, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश सोनिया कानशिडे यांनी केले. तालुका विधी सेवा समिती आणि दिवाणी न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमांतर्गत आयोजित लोकअदालतीचे कानशिडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी एम.ए.गवंडी, सरकारी वकील कुलकर्णी, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी शरद मगर आदी उपस्थित होते.जास्तीतजास्त प्रकरणे तडजोडीने निकाली निघावीत यासाठी महालोकअदालत वारंवार आयोजित केली जाते. प्रकरण निकाली लागेपर्यंत बराच वेळ लागत असतो. न्यायालयाच्या प्रक्रियेत एक बाजू हरते तर दुसरी जिंकते. वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित ठेवण्यापेक्षा वेळेत दोन्ही पक्षांच्या सहमतीने मिटवण्यासाठी लोकअदालत हे माध्यम आहे. न्यायालयात येऊ घातलेली प्रकरणेही लोकअदालतीमधून मिटू शकतात. तहसीलदार घारे म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी हक्क चळवळ सुरू झाली. घटनेने माणसाला जीवन जगण्याचा हक्क उपभोगण्यासाठी स्वातंत्र्य दिले. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार होताना इतरांच्या अधिकारांवर गदा येऊ लागली. आपले स्वातंत्र्य उपभोगताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. चांगला नागरिक बनून सशक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. पी. तानवडे यांनी केले. सहा पॅनेलच्या माध्यमातून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. (प्रतिनिधी)वकील संघटनेचा बहिष्कारकोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीसाठी वकील संघटनेने दोन दिवस बंद पुकारण्याबरोबरच राष्ट्रीय लोकअदालतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे तालुका विधी सेवा समितीच्या सहकार्याने होणारा हा उपक्रम वकिलांच्या अनुपस्थित पार पडला. विठोबा ताम्हाणेकर यांचा सत्कारउद्घाटन कार्यक्रमातच ज्येष्ठ नागरिक हरकुळ बुद्रुकचे विठोबा ताम्हाणेकर यांचा सत्कार न्यायाधीश कानशिडे यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आला.